रहाटकरांना भाजपची उमेदवारी, बिनविरोधाची शक्यता मावळली

राज्यात सहा जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीतली रंगत वाढलीय.

Updated: Mar 12, 2018, 08:29 PM IST
रहाटकरांना भाजपची उमेदवारी, बिनविरोधाची शक्यता मावळली title=

नवी दिल्ली : राज्यात सहा जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीतली रंगत वाढलीय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळलीय. 

कुमार केतकरांचा काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज

भाजपकडून जावडेकरांनंतर नारायण राणे आणि केरळचे प्रदेशाध्यक्ष व्ही मुरलीधरन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर कुमार केतकर यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे सहा जागांसाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे सर्वांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता होती. 

२३ मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक

मात्र आता भाजपच्या विजया रहाटकर यांनाही उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता आहे. २३ मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक होत आहे.