सलूनमध्ये माकडाने केली दाढी... तुम्ही कधी असा व्हिडीओ पाहिलाय का?

आतापर्यंत तुम्ही मांजर आणि कुत्र्याला सलूनमध्ये केस कापताना पाहिलं असेल पण चक्क माकड जेव्हा सलूनमध्ये गेलं तेव्हा काय घडलं पाहा व्हिडीओ

Updated: Dec 3, 2021, 05:50 PM IST
सलूनमध्ये माकडाने केली दाढी... तुम्ही कधी असा व्हिडीओ पाहिलाय का?  title=

नवी दिल्ली: एखादी मांजर किंवा कुत्रा तुम्ही मस्त मजेत बसल्याचं पाहिलं असेल. मांजर असो किंवा कुत्रा अगदी अंघोळीपासून ते अंगावरचे केस कापण्यापर्यंत शांत बसून राहिल्याचे अनेक छान व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सलूनमध्ये जर एखादं माकड जाऊन बसलं तर? याचा विचार केला तरी आपल्याला लगेच हसायला येतं. 

चक्क एक माकड सलूनमध्ये गेलं आहे. तिथे त्याने आपली दाढी करून घेतली. एरवी जराही शांत न बसणारं माकड सलूनमध्ये खूप शांत बसलं आहे. ते शांतपणे दाढी करून घेत आहे. जसं मशीन फिरेल तसं तो त्या मशीनकडे कुतूहलाने पाहात आपली मान डोलवताना दिसत आहे. 

आरशासमोर हे माकड बसून न्याहाळत आहे. नेमकं काय चाललं आहे ते पाहात आहे. तर सलूनमधील व्यक्तीनं ट्रिमरने त्याचे केस कापायला सुरुवात केली. तिथल्या लोकांनी माकड दाढी करत असल्याचा हा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

सध्या या माकडाच्या दाढीची आणि हेअरस्टाइलची जोरदार चर्चा आहे. या माकडाच्या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान लाईक मिळाले आहेत. तर लोकांनीही जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत. काही लोक म्हणाले गजब आहे. तर काही लोकांनी या माकडावर चक्क कविता पोस्ट केली आहे.