माशाकडून मगरीची शिकार...स्वत:च्याच जाळ्यात फसली मगर पाहा शिकारीचा थरारक व्हिडीओ

शिकार करायला आली मात्र स्वत: जीव गमावून बसली, पाहा नेमकं काय घडलं व्हिडीओ

Updated: Sep 29, 2021, 10:29 PM IST
माशाकडून मगरीची शिकार...स्वत:च्याच जाळ्यात फसली मगर पाहा शिकारीचा थरारक व्हिडीओ title=

मुंबई: मगरीला सर्वजण घाबरतात अगदी पाण्यातील छोट्या मोठ्या किडे-माशांपासून ते माणसांपर्यंत. खाण्याच्या शोधत असलेल्या मगरीनं माशाची शिकार करण्याचा डाव आखला. मात्र हाच डाव तिच्यावर उलटला आणि स्वत:च शिकार झाली. या मगरीला आपला जीव गमवण्याची वेळ आली आहे. मोठ्या मगरीला चक्क माशामुळे आपला जीव गमवावा लागला. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मगर आणि मासा दिसत आहे. ही मगर माशाची शिकार कऱण्याच्या तयारीमध्ये आहे. मासा आपलं तोंड वर काढतो तेव्हा मगर या माशाची शिकार करायला जाते. तेव्हा या मगरीलाच 860 व्होल्टचा झटका लागतो. या मगरीला माशाचा करंट लागल्याने ती जीव वाचवण्यासाठी तडफडते.

माशाची शिकार करण्याचा नाद या मगरीला महागात पडला. या मगरीलाच आपला जीव गमवण्याची वेळ आली. माशाचा करंट बसल्याने मगरीनं आपला जीव सोडला. मगर ज्या माशाला एक सामान्य मासा समजत होती तिथेच ही मगर फसली. हा मासा विशिष्ट प्रजातिचा होता. 

ईल नावाच्या या माशामध्ये 860 व्होल्ट करंट येतो असं सांगितलं जात आहे. या माशाचं ते वैशिष्ट्य आहे. या माशाची शिकार करण्याच्या नादात मगरीला आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये या माशाचा देखील शेवटी मृत्यू होतो असं दिसतं आहे. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ आतापर्यंत 8 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या व्हिडीओची झी 24 तास कोणतीही पुष्टी करत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.