मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल चर्चेचा सुरूच असते. कधी एखाद्या फोटोबद्दल चर्चा होत असतात, तर कधी एखादा व्हिडिओ चर्चेत असतो. त्यात आता डिजीटलच्या जगात वर्तमानपत्रातील लग्नाची एक जाहिरात लोकांमधील चर्चेचा विषय बनली आहे. ही जाहिरात वाचल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.
या जाहिरातीमध्ये, मुलीने तिला कसा मुलगा पाहिजे किंवा ती कशा प्रकारच्या मुलाच्या शोधात आहे? हे लिहले आहे. जे वाचून सध्या सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. या मुलीच्या अपेक्षा इतक्या भारी आहेत की, जे वाचल्याने लोकांना त्यांचे हसूच आवरले नाही आणि त्यांनी या जाहिरातीला सोशल मीडियावर मोठ्या संख्येने शेअर केले आहे.
व्हायरल होत असलेल्या या जाहिरातीमध्ये एका महिलेने तिच्या अपक्षा सांगितल्या की, तिला एकुलता एक मुलगा हवा, त्याला बहीण किंवा दुसरे कोणतेही भावंड नको. त्याचप्रमाने मुलाचा स्वत:चा बिझनेस असावा आणि त्याच्याकडे एक बंगला असावा, 20 एकरच्या भागात एक फार्म हाऊस असावा. त्याच बरोबर वराला स्वयंपाक करता यायला हवा.
त्या मुलीने या जाहिरातीत तिच्या बद्दल लिहिताना सांगितले की, तिचे लहान केस आहेत. तिने शरीराव बहुतेक ठिकाणी पिअर्सींग म्हणजे टोचून घेतले आहे आणि ती भांडवलशाहीविरूद्ध काम करत आहे ती स्त्रीवादी विचारधारा करणारी आहे.
इंटरनेटच्या जगात या अशा प्रकारची लग्नाची जाहिरात मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्यावर लोकं कमेंट्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
सोशल मीडीयावर या जाहिरातीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. या जाहिरातीवर एका यूझरने सांगितले की, 'ही जाहिरात पाहिल्यानंतर मी हसणे थांबवू शकत नाही.' दुसर्या यूझर्सने लिहिले की, यावर्षी मी पाहिलेली ही सर्वात मजेशीर आणि आश्चर्यकारक जाहिरात आहे. या व्यतिरिक्त इतर बर्याच यूझर्सनी या जाहिरातीवर आपले मत दिले आणि वधूला आजीवन अविवाहीत राहण्याचा सल्ला दिला.
Did someone put out a matrimonial ad for me pic.twitter.com/DKsbk0iijT
— Toolkit for Hot Takes (@awryaditi) June 15, 2021
असे असले तरी, या जाहिरातीच्या सत्यतेबद्दल संशय निर्माण केला जात आहे. यावर एका मीडिया अहवालात असे म्हटले गेले आहे की, त्यांनी नुकतीच या गोष्टीची सत्याता तपासली होती. त्य़ानंतर त्यांना समजले की, ही जाहिरात खोटी आहे आणि ती मनोरंजनासाठी बनवली गेली आहे.
जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या ईमेलवर (curbyourpatriarchy@gmail.com) संपर्क साधला असता असे समोर आले की, ही जाहिरात महिला, तिचा भाऊ आणि तिचा मित्र यांनी मिळून लोकांच्या मनोरंजनासाठी केली होती.