बाईकवरती स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, अचानक गेला तोल आणि... पाहा व्हायरल व्हिडीओ

हा तरुण ही बाईक बसून नाही तर उभा राहून चालवत आहे,

Updated: Nov 28, 2021, 08:47 PM IST
बाईकवरती स्टंट करणं तरुणाला पडलं महागात, अचानक गेला तोल आणि... पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई : आजची तरुण मंडळींना नेहमीच काहीतरी वेगळं करुन दाखवायचं असतं. त्यात आता सोशल मीडिया हे त्यांना चांगलचं प्लॅटफॉर्म मिळलं आहे. ज्यामुळे ही तरुण मंडळी आपलं टॅलेंट या प्लॅटफॉर्मवरती दाखवू लागले आहेत. ते यावरती आपला व्हिडीओ अपलोड करतात ज्यामुळे त्यांना त्यांचे फॉलोअर्स वाढतात आणि त्यांना प्रसिद्धी देखील मिळते. परंतु काही तरुण प्रसिद्घी मिळवण्यासाठी आपल्या जीवाचीही परवा करत नाहीत आणि आपले प्राण धोक्यात टाकतात.

आज-कालच्या तरुण लोकांमध्ये स्टंटचा क्रेज वाढला आहे, तरुण वयोगटातील मुलं बाईक सोबत वेगवेगळे स्टंट करतच असतात. काही तरुण स्टंट करण्याला मस्करीत घेतात परंतु ते त्यांना महागात पडू शकतो, यामुळे त्यांचा जिव देखील जाऊ शकतो. त्यात आता सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती विचित्र स्टंट करत आहे. तो महामार्गावर बाईक चालवत आहे, परंतु तो तरुण ही बाईक बसून नाही तर उभा राहून चालवत आहे, त्यानंतर या तरुणासोबत काय घडलं तुम्हीच पाहा.

हा तरुण बाईक चालवताना, बाईकला वर उचलतो, जे खरोखरच धोक्याचे आहे, परंतु एवढ्यावरच न थांबता हा तरुण पुढे बाईकवरती उभा राहातो, तर कधी हात सोडतो, तर कधी सीटवरून बाजूला पाय टाकतो आणि शेवटी स्टाइल मारण्याच्या प्रक्रियेत बाईकवरून उतरतो आणि बाजूने चालायला लागतो. त्यानंतर त्याचे संतुलन बिघडते आणि तो दुचाकीसह खाली पडतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ पाहून एखाद्या व्यक्तीच्या धाडसाचे कौतुक करावे की, अशा धोकादायक कृती केल्याबद्दल त्याच्या मूर्खपणावर हसणे हे लोकांना समजत नाही. एका वापरकर्त्यावर कमेंट करताना लिहिले, 'असे स्टंट करण्यापूर्वी आपण खूप सराव केला पाहिजे.' दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले केली की 'पुढच्या वेळी स्टंट करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल'.