अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणं ठरू शकतं जीवघेणं, पाहा व्हिडीओ

तुम्हाला किंवा तुमच्या ग्रूपमध्ये कोणला असा वाढदिवस साजरा करायची सवय असेल तर सावधान! 

Updated: Nov 30, 2021, 09:46 PM IST
अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणं ठरू शकतं जीवघेणं, पाहा व्हिडीओ

मुंबई: वाढदिवस म्हटलं की उत्साह खूप मोठा असतो. अगदी सजावटीपासून ते केक कापण्यापर्यंत. कधीकधी मित्र-मैत्रीणींची मस्ती आणि मजा ही जीवावर बेतते. यापूर्वी देखील असे जीवघेणे प्रकार घडले आहेत. मात्र तरीही अजूनही काही असे लोक आहेत जे अजूनही जीवघेण्यापद्धतीनं वाढदिवस साजरा करतात.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ फिरत आहे. या व्हिडीओमध्ये मित्र-मित्र जमतात. एक तरुणाचा वाढदिवस साजरा करायचा प्लॅन होतो. केक आणला जातो. मित्र मिळून केक कापण्याऐवजी वाढदिवस असलेल्या तरुणाचं तोंड केकमध्ये बुडवतात. इतकच नाही तर त्याला केकने पूर्ण अंघोळ घालतात. 

हा सगळा प्रकार झाल्यानंतर या तरुणाला सगळे मित्र मिळून मस्करीत मारतात. हा सगळा प्रकार बराचवेळ सुरू असतो. अखेर ते मित्राला रस्त्यावर खाली सोडतात. मात्र ज्याचा वाढदिवस आहे तो मित्र जागचा काही केल्या उठत नाही. 

हा सगळा प्रकार घडलेला  पाहून मित्र घाबरतात. त्याच्या तोंडावर पाणी मारतात. मात्र तो काही उठत नाही. अखेर ते मित्र त्याला बाईकवर घेऊन रुग्णालयात घेऊन जातात. अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणं जीवावर बेतू शकतं. त्यामुळे अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणं टाळा.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झी 24 तास या व्हिडीओची कोणतीही पुष्टी करत नाही. अशा प्रकारे वाढदिवस साजरा करू नका.