अकल बडी की भैंस बडी? हा व्हिडीओ पाहून तुम्ही काय म्हणाल?

अंगावर आलं नसलं तरी शिंगावर भारी घेतलंय...म्हशीचं हे टॅलेंट पाहून तुम्हीही हैराण व्हाल पाहा व्हिडीओ

Updated: Sep 22, 2021, 09:54 PM IST
अकल बडी की भैंस बडी? हा व्हिडीओ पाहून तुम्ही काय म्हणाल?

नवी दिल्ली: बऱ्याचदा लहान मुलं किंवा तरुणांनाही बोटावर बॉल घेऊन फिरवण्याची सवय असते. हा खेळ खूप फेमस आहे मध्यंतरी याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. आता या सगळ्यांना अवाक करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही अंगावर आलं नसलं तरी शिंगावर भारी घेतलंय असं म्हणाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की म्हशीनं आपल्या शिंगावर छोटं टप घेतलं आहे. हे टप ती म्हैस आपल्या शिंगावर गोलगोल फिरवते आहे. तिची ही कला सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या म्हशीकडे समोर बसलेली गाय देखील पाहात आहे. या म्हशीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

या म्हशीच्या व्हिडीओवर लोकांनी फार मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. या म्हशीकडे टॅलेंटची कमी नाही असं एका युझरने म्हटलं आहे तर दुसरा युझर म्हणाला की भारताला विश्वगुरू उगाच म्हणत नाहीत. 

हा व्हिडीओ 31 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळालेली नाही. झी 24 तास या व्हिडीओची कोणतीही पुष्टी करत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.