Viral Video : डायरेक्ट धावत्या स्कॉर्पिओवरुन आतषबाजी; आता अटक होणार!

फटाके फोडतोनाचा अतिशय खतरनाक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.  या व्हिडिओत धावती कार आणि बाईकवर फटाके पोडण्यात येत आहेत. 

Updated: Nov 14, 2023, 07:43 PM IST
Viral Video : डायरेक्ट धावत्या स्कॉर्पिओवरुन आतषबाजी; आता अटक होणार!   title=

Viral Video :  फटाक्यांची आतषबाजी करत दिवाळीचा सण साजरा केला जातो. फटाके हा ज्वलनशील पदार्थ आहे. यामुळेच फटाके फोडताना काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडित अगदी खतरनाक पद्धतीने फटाके फोडण्यात येत आहेत. डायरेक्ट धावत्या स्कॉर्पिओवरुन आतषबाजी करण्यात आली आहे. असा भयानक पद्धतीने फटाके फोडणाऱ्या या वाहनचालकाचा पोलिस शोध घेत आहेत. 

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक स्कॉर्पिओ कार भरधाव वेगाने धावत आहे. या धावत्या स्कॉर्पिओच्या छतावरच फटाके फुटत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हायवेवरुन ही स्कॉर्पिओ भरधाव वेगाने जात आहेत. या धावत्या कारवरच फटाके फुटक फुटत आहेत. या स्कॉर्पिओच्या बाजूने अनेक वाहने ये जा करत आहेत. अशा प्रकारे भर रस्त्यात धावत्या वाहनावर फटाके फोडणे धोकायदक ठरु शकते. 

धावत्या स्कॉर्पिओवर फटाके फोडण्याचा जीवघेणा स्टंट

Sahil Rukhaya नावाच्या व्यक्तीने  @Sahilrukhaya7 या एक्स  हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.  #गुरुग्राम-चलती कार की छत पर पटाखे फोड़ते दिखे हुड़दंगीं,खतरनाक स्टंट का वीडियो वायरल, जाँच में जुटी गुरुग्राम पुलिस, सोशल मीडिया पर वायरल हुआ वीडियो.. असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले आहे. 

भयानक स्टंटबाजी करणाऱ्याचा शोध सुरु

असा प्रकारे धावत्य स्कॉर्पिओवर फटाके फोडण्याची भयानक स्टंटबाजी करणाऱ्याचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे. हा व्हिडिओ गुरुग्राम येथील आहे. स्कॉर्पिओच्या नंबर प्लेटच्या मदतीने पोलिस या कारचालाकचा शोध घेत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे फटाक्यांची आतषबाजी करणे इतरांसाठी धोकादायक ठरु शकते. पोलिस या वाहनचालकाला शोधून त्याला अटक करणार आहेत. या स्कॉर्पिओच्या मालकाचा शोध घेण्यासाठी पोलिस आसपासच्या परिसरातील CCTV फुटेज देखील तपासत आहेत. 

बाईकवर फटाके फोडले

अशाच प्रकारे तामिळनाडूमध्ये देखील धावत्या बाईकवर स्टंटबाजी करत फटाके फोडण्यात आले आहेत. तामिळनाडूमध्ये काही अति उत्साही तरुण धावत्या बाईकवर फटाके फोडत असल्याचे दिसत आहे. एका तरुणाने तर फेटती फटाक्यांची माळ हातात धरल्याचे व्हिडिओत दिसत आहे. व्हायरल व्हिडिओच्या मदतीने पोलिसांनी तब्बल 10 जणांना अटक केली आहे. विविध कलमाअंतर्गत यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.