आनंद महिंद्रा यांचा जुळा भाऊ सापडला? उद्योजकांनी स्वतःच ट्विट करून दिलं उत्तर!

सोशल मिडियावर सध्या आनंद महिंद्रा यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. आनंद महिंद्रा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Nov 14, 2023, 06:42 PM IST
आनंद महिंद्रा यांचा जुळा भाऊ सापडला? उद्योजकांनी स्वतःच ट्विट करून दिलं उत्तर! title=

lookalike Anand Mahindra :  महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आणि भारतातील सर्वात नामांकित उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर चांगलेच अ‍ॅक्टिव्ह आहेत. आनंद महिंद्रा हे अनेक इंटरेस्टिंग गोष्टी सोशल मिडियावर शेअर करत असतता. तसेच ते सोशल मिडियावर अनेकांशी इंटरॅक्च देखील होत असतात. सेम टू सेम आनंद महिंद्रा यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोट  सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती  आनंद महिंद्रा यांचा जुळा भाऊ असल्याचा म्हणत हा फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत या व्हायरल फोटोवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

@pjdaddyofficial नावाच्या एक्स अकाऊंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हजारो लोकांनी हा फोटो पाहिला आहे. 256 लोकांनी हा फोटो रिट्विट केला आहे. तर 300 पेक्षा जास्त लोकांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत. 

फोटोतील व्यक्ती आहे तरी कोण?

@pjdaddyofficial नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या फोटोतील व्यक्ती सेम टू सेम आनंद महिंद्रा यांच्यासारखी दिसत आहे. पीजे नावाच्या व्यक्तीने त्याच्या एका सहकाऱ्याचा फोटो पोस्ट केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी आनंद महिंद्रा यांनाही टॅग केले. या व्यक्तीला पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा माझा पुण्याचा सहकारी आहे जो आनंद महिंद्रासारखा दिसतो असे कॅप्शन या व्यक्तीने या फोटोला दिले आहे.

माझा जुळा भाऊ; आनंद महिंद्रा यांचा रिप्लाय

फोटो शेअर करताना पीजे नावाच्या व्यक्तीने आनंद महिंद्रा यांनाही टॅग केले होते. यावर आनंद महिंद्रा यांनाही अगदी गमतीशीर रिप्लाय केला आहे. लहानपणी आम्ही जत्रेत हरवलो होतो असंच हा फोटो पाहून वाटतं असल्याचे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे. 

फोटोवर कमेंटचा पाऊस

 पीजे नावाच्या व्यक्तीने शेअर केलेल्या या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. हा व्यक्ती म्हणजे आनंद महिंद्रा यांचा जुळा भाऊ आहे असे काही लोकांनी म्हंटले आहे. तर, आनंद महिंद्रा यांचा हरवलेला भाऊ सापडला अशा अनेक कमेंट्स या फोटोवर येत आहेत.