यांना कोणीतरी आवरा रे! 'ट्रॅक्टरच्या चाकात अडकवली मान आणि....' 'जीव जाईल पण स्टंटपती नाही..'

Instagram Viral Video: आपल्या व्हिडीओवर जास्त लाईक्स, कमेंट्स कसे येतील यासाठी ते काहीही करायला तयार असतात.

Pravin Dabholkar | Updated: Jun 25, 2024, 02:53 PM IST
यांना कोणीतरी आवरा रे!  'ट्रॅक्टरच्या चाकात अडकवली मान आणि....' 'जीव जाईल पण स्टंटपती नाही..' title=
insta Viral Video

Instagram Viral Video: मागचा काही काळ अंगप्रदर्शन करणाऱ्या टिकटॉकर्सनी उच्छाद मांडला होता. आता त्यांची जागा वेडवाकडं वागून जीव धोक्यात टाकणाऱ्या रिल्स स्टार्सनी घेतलीय. काही लाईक्स, कमेंट्ससाठी लोकं स्वत:चा जीव जाईल याचीही काळजी करत नाहीत. अगदी 15 दिवसांपूर्वी संभाजी नगरमध्ये रिल्स बनवताना कारसह मुलगी दरीत कोसळली. त्याला महिना उलटेना तोवर पुण्यात टेकडीवर लटकून रिल्स बनवल्याचा प्रकार समोर आला होता. आता आणखी एक रिल्सस्टारचा व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये तो ट्रॅक्टरच्या चाकात मान अडकवून गोल गोल फिरतोय. 

सध्याच्या तरुण पिढीवर रिल्सस्टारचा फिव्हर चढलाय. सर्वांनाच इथे फॉलोअर्स वाढवायचे आहेत. आपल्या व्हिडीओवर जास्त लाईक्स, कमेंट्स कसे येतील यासाठी ते काहीही करायला तयार असतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. असा प्रकार तुम्ही कधी पाहिला नसेल. 

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ट्रकच्या मागच्या टायरमध्ये एका इसमान स्वत:ला अडकवून ठेवलंय. त्याने दोन्ही हाताने ट्रॅक्टरचा भलामोठा टायर पकडून ठेवलाय. ट्रॅक्टर सुरु झाला आणि गोल फिरु लागला. त्यासोबत हा इसमही गोल फिरु लागलाय. त्याचा हात चुकून सुटला असता तर तो काही क्षणात महाकाय टायरखाली आला असता. त्याचा जीव गेला असता. अर्थात पुढे त्याचं काय झालं हे अद्याप समोर आलेलं नाही. पण हा व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होतोय. 

पाहा व्हिडीओ 

हा व्हिडीओ एक्स (आधीचे ट्विटर) वर @PalsSkit या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलाय. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. लोक त्याला उपदेश करत आहेत. जीव जाईल पण तुझी स्टंटपती जाणार नाही, अशा कमेंट आल्या आहेत.  हा व्हिडीओ 1500 हून अधिकजणांनी पाहिलाय.

आपल्या देशात नमुन्यांची काही कमी नाही, अशी कमेंट एकाने केलीय. तर यांच्यासाठी आता काही शब्दच राहिले नाहीत, असे दुसऱ्याने लिहिले आहे. काहीतरी स्किल आहे भावाकडे असे म्हणत एकाने त्याची खिल्ली उडवली आहे. तर काहीतरी आनंद झाल्याने असं करतोय, असंही यूजरने लिहिलंय. तर अशी लोक मानसिक रुग्ण असू शकतात, अशी कमेंट्सदेखील करण्यात आलीय.