मुंबई : काही लोक बाईक चालवताना वेग इतका वेगात ठेवतात की, अपघात होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. अशा परिस्थितीत तो केवळ आपला जीव धोक्यात घालत नाही, तर रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या इतर लोकांचाही जीव धोक्यात टाकतो. परंतु हे लोकं काही स्वत:ला आवरत नाहीत. आता तर सोशल मीडियावर कोणताही कंटेन्ट टाकून प्रसिद्धी मिळवता येते, मग यासाठी हे लोकं कोणत्याही थराला जातात आणि स्वत: बरोबर दुसऱ्याचाही जीव धोक्यात टाकतात. अशाच एका व्यक्तीने धोकादायक बाइक स्टंट करण्याचा प्रयत्न केला जो अत्यंत चुकीचा ठरला.
मोटारसायकलच्या मागे कारमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. व्हिडीओमध्ये, एक बाइकर संपूर्ण किट आणि हेल्मेट वैगरे घालून मोटरसायकल चालवताना दिसत आहे. हा एक दुतर्फा रस्ता आहे, परंतु याच्या मध्यभागी दुभाजक नाही.
स्टंट दाखवण्यासाठी दुचाकीस्वाराने दुचाकीचे पुढील चाक हवेत उचलत भरधाव वेगाने गाडी चालवण्यास सुरुवात केली. परंतु भरधाव वेगात गाडी चालवत असताना त्याचा तोल बिघडतो आणि विरुद्ध बाजूने येणाऱ्या एका मोठ्या ट्रकला तो धडकतो. त्या ट्रकला धडकल्यानंतर त्याच्या दुचाकीचा स्फोट होतो आणि दुचाकीस्वार भीषण अपघाताचा बळी ठरतो.
असा स्टंट फसण्याची किंवा अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर कॅप्शनसह शेअर केला आहे.
#BeSafe
ऐसा मत करनाHero की Heropanti nikal gayi @ipskabra @arunbothra @ipsvijrk pic.twitter.com/fHZ2mo7Rgb
— Rupin Sharma IPS (@rupin1992) October 27, 2021
त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “सुरक्षित राहा. असे करू नका. या हिरोची हिरोपंती निघून गेली. या व्हिडीओला आतापर्यंत 5 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.