रस्त्यावर उभ्या असलेल्या कारचा भीषण अपघात, काही सेकंदात होत्याचं नव्हतं; पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Updated: Sep 28, 2021, 04:24 PM IST
रस्त्यावर उभ्या असलेल्या कारचा भीषण अपघात, काही सेकंदात होत्याचं नव्हतं; पाहा व्हिडीओ

हरियाणा : सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी आपले मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ हे आपल्या अंगावर काटा उभा करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका अपघाताचा आहे. ही घटना हरियाणाची असल्याचे सांगितले जात आहे. हा ऍक्सिडेंट CCTV कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कार रस्त्याच्या बाजूला एक व्यक्ती उभा असतो. तो एका कारची वाट पाहत असतो. त्यादरम्यान त्याची कार येते आणि हा व्यक्ती आपल्या हातातील सामान या कारमध्ये ठेऊ लागतो. तेव्हा या कारमधून दोन व्यक्ती बाहेर उतरताता.

व्हिडीओ पाहून असे वाटत आहे की, हे व्यक्ती सगळे जण कुठेतरी फिरायला किंवा पिकनिकला जात असावेत. तेवढ्यात कोणाला काही कळण्याच्या आता मागून एक भरधाव गाडी येते जी कोणाला काही कळायच्या आत, गाडीत सामान ठेवणाऱ्या व्यक्तीला आणि कारमधील एक ड्रायव्हर आणि पुढे बसलेल्या एका व्यक्तीला घेऊन जाते.

हा अपघात किंवा ही टक्कर इतकी जोरात झाली आहे, ज्यामुळे या तिघांन पैकी कोणी जिवंत वाचले असतील याची शक्यता फारच कमी आहे. या व्हायरल व्हिडीओने प्रत्येकालाच मोठा धक्का दिला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांचा थरकाप उडत आहे, कारण काही सेकंदातील हा अपघात अतिशय भयंकर आहे.

काळ कधी सांगून येत नाही आणि ही मागून येणारी कार कदाचीत त्या कारमधील तीन व्यक्तींचा काळ घेऊन आली असावी. या कारमध्ये बसलेल्या दोन व्यक्तींच्या नशीबाने मात्र त्यांना चांगली साथ दिली. कारण ते जर काही सेकंदापूवी या कारमधून उतरले नसते, तर त्यांचं काय झालं असत हे काही वेगळं सांगायला नको.

हा व्हिडीओ व्हायरल असल्यामुळे यासंदर्भात अद्यापतरी संपूर्ण माहिती मिळालेली. त्यामुळे ठोकर झालेल्या या दोन्ही गाडीतील लोकांचं काय झालं असेल हे सांगणं कठीण आहे.