'2000 ची नोट दिसताच टाकीत भरलेलं पेट्रोल काढून घेतलं', पेट्रोल पंपावर अजब प्रकार, VIDEO तुफान व्हायरल

Viral Video: केंद्र सरकारने 2000 च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम आहे. यादरम्यान एका तरुणाला अजब अनुभव आला आहे. तरुणाने बाईकमध्ये पेट्रोल (Petrol) भरल्यानंतर 2000 ची नोट दिली असता कर्मचाऱ्याने त्याच्या टाकीतून पेट्रोल पुन्हा काढून घेतलं. तरुणाने हा व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला असून, सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) केला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 23, 2023, 05:09 PM IST
'2000 ची नोट दिसताच टाकीत भरलेलं पेट्रोल काढून घेतलं', पेट्रोल पंपावर अजब प्रकार, VIDEO तुफान व्हायरल

Viral Video: केंद्र सरकारने 2000 च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) लोकांना 2000 च्या नोटा ऑक्टोबरनंतरही 2000 च्या वैध असतील असं स्पष्ट करत नागरिकांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण यानंतर अनेक दुकानदार, पेट्रोल पंप मालक 2000 च्या नोटा स्वीकारण्यास नकार देत आहेत. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून असंही काही होऊ शकतं असा विचार तुम्ही कराल.

पेट्रोल पंपावर एका तरुणाला अजब अनुभव आला आहे. तरुणाने बाईकमध्ये पेट्रोल (Petrol) भरल्यानंतर 2000 ची नोट दिली असता कर्मचाऱ्याने त्याच्या टाकीतून पेट्रोल पुन्हा काढून घेतलं. तरुणाने हा व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला असून, सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) केला आहे. 

सोमवारी सकाळी तरुण आपली स्कुटी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी पोहोचला होता. तरुणाने 200 रुपयांचं पेट्रोल भरल्यानंतर 2000 रुपयांची नोट दिली. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने ही नोट घेण्यास नकार दिला. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. काही केल्या सुट्टे पैसे देण्यावर कर्मचारी अडलेला होता. 

सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत 2000 च्या नोटा चलनात असतील असं सांगितलं असल्याची माहिती सांगत तरुणाने कर्मचाऱ्याला दिली. त्यावर कर्मचाऱ्याने आपल्याकडे सुट्टे पैसे नाहीत असं सांगण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर त्याने स्कुटीमध्ये टाकलेलं पेट्रोल पुन्हा बाहेर काढून घेतलं. यानंतर तरुणाने या सगळ्या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करत सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. 

पेट्रोल पंपाचे संचालक राजीव गिरहोत्रा यांनी यावर सांगितलं आहे की , जेव्हापासून आरबीआयने आदेश दिला आहे तेव्हापासून बाजारात 2000 च्या नोटांचं प्रमाण वाढलं आहे. याचा सर्वात जास्त परिमाण पेट्रोल पंपावरील व्यवहारावर झाला आहे. याआधी दिवसातून 2 ते 3 वेळाच 2000 च्या नोटा आम्हाला मिळत होत्या पण आता 70 नोटा येत आहेत. आमचा 2000 ची नोट घेण्यास नकार नाही. पण त्यासाठी तुम्ही 2000 किंवा 4000 चं पेट्रोल भरत असाल तर आमचा काही आक्षेप नाही. 

नोट स्वीकारण्यास नकार दिला तर काय?

RBI च्या नियमानुसार, जर एखादी बँक 2000 रुपयांची नोट स्वीकारण्यास नकार देत असेल तर तुम्ही सर्वात आधी संबंधित बँकेच्या मॅनेजरकडे तक्रार करु शकता. तसंच प्रत्येक बँकत एक तक्रार पुस्तक असतं, जिथे तुम्ही रिपोर्ट करु शकता. बँकेला तुम्हाला 30 दिवसांच्या आत उत्तर द्यावं लागेल. जर असं झालं नाही, किंवा तुम्ही बँकेच्या उत्तरावर समाधानी नसाल तर रिझर्व्ह बँकेची वेबसाईट cms.rbi.org.in वर जाऊन तक्रार करु शकता.