मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे फारच मनोरंजक असतात. परंतु कधी कधी आपल्याला सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात जे स्टंटशी संबंधीत असतात. अनेक तरुण मंडळी हे प्रसिद्धीसाठी करत असतात. परंतु असं करत असताना ते आपल्या जीवाची जराही पर्वा करत नाहीत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे.
अमेरिकेतील डिस्ने कॅलिफोर्निया ऍडव्हेंचर पार्कमध्ये स्पायडर-मॅन रोबोटने केलेला स्टंट नुकताच चुकीचा ठरला, जो पाहून अनेक लोकांच्या संवेदना उडाल्या. आपण सिनेमात पाहिलं आहे की, सुपरहिरो असो किंवा स्पायडरमॅन ते कसे या टोकावरुन त्या टोकावर उड्या मरतात. त्याचं हे स्टंट पाहून अनेकांना अप्रुप वाटतं. परंतु आज सुपरहिरोचाच स्टंट फसलेला पाहून लोकांना चांगलाच धडा शिकायला मिळाला आहे.
खरं पाहाता सुपरहिरो हे काल्पनिक असतात आणि त्यांनी दाखवले गेलेले स्टंट हे एडिट केले किंवा ग्राफिक्सवर केले असतात. त्यामुळे ते सिनेमात पाहाताना आपल्याला भारी वाटतं परंतु, जेव्हा खऱ्या आयुष्यात जेव्हा कोणी असं जीवघेणं स्टंट करतं, तेव्हा त्याचं काय होतं, हे या व्हिडीओने दाखवलं आहे.
ही घटना कोणीतरी त्यांच्या स्मार्टफोनवर रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर अपलोड केली, त्यानंतर ती लवकरच व्हायरल झाली.
15-सेकंद लांब व्हिडीओ क्लिप पोस्ट केल्यापासून दोन दिवसांत 1.18 लाखांहून अधिक व्ह्यूज याला मिळाले आहेत. बर्याच प्रेक्षकांना वाटले की, हा एक माणूस आहे आणि त्या दुःखद अपघात झाला आहे. परंतु तसे नाही हा फक्त एक रोबोट होता. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून तुम्हाला त्या व्यक्तीचं काय झालं असेल, असा प्रश्न पडला असेल, तर काळजी घेऊ नका.