हिजाब घालून बाईक चालवणाऱ्या महिलांकडून फ्लाईंग किस, व्हिडीओ व्हायरल

चार महिला दोन बाईकवर बसल्या आहेत. त्या नुसत्याच बसल्या नाहित तर त्यांनी हिजाब घातला आहे.

Updated: Feb 10, 2022, 07:52 PM IST
हिजाब घालून बाईक चालवणाऱ्या महिलांकडून फ्लाईंग किस, व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : हिजाबवरुन सध्या देशभरात हंगामा सुरु आहे. हा वाद कर्नाटकामधून सुरू झाला. ज्याचे पडसाद आता महाराष्ट्रात देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. देशभरातून लोक आता वेगवेगळ्या प्रकारे हिजाबच्या समर्थनासाठी उतरले आहेत. यामध्ये लोक पोस्टबजी करत समर्थन करताना दिसले. त्यात आता आणखी काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये महिला हिजाब घालून धूम स्टाईल बाईक चालवताना दिसत आहेत. तर काही महिला फुटबॉल खेळताना दिसत आहेत. हे व्हिडीओ सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चार महिला दोन बाईकवर बसल्या आहेत. त्या नुसत्याच बसल्या नाहित तर त्यांनी हिजाब घातला आहे.

पहिल्या व्हिडीओमध्ये चार तरुणी हिजाब घालून भोपाळच्या व्हीआयपी रोडवरून सुसाट बाईक चालवताना दिसतायत. यापैक दोन तरुणी बुलेटवर बसल्यात.  तर दुसऱ्या दोघी धूम स्टाईल स्पोर्टस् बाईकवर बसल्या आहेत.

एक तरुणी तर चक्क फ्लाईंग किस देताना दिसतेय, धक्कादायक बाब म्हणजे या तरुणींना समर्थनाच्या नादात वाहातुक नियमांचा विसर पडला आहे, ज्यामुळे कळत-नकळत त्यांनी वाहतूक नियम तोडले आहेत. 

दुस-या व्हिडीओत महिला हिजाब घालून फुटबॉल खेळताना दिसत आहेत. मध्य प्रदेशात हिजाबवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ भोपाळच्या इंदिरा प्रियदर्शिनी कॉलेजच्या विद्यार्थिनी हिजाब घालून चक्क फुटबॉल खेळल्या आणि त्यांनी हिजाब बंदीच्या निषेधार्थ हे पाऊल उचललं आहे.