Viral Video: दिवा लावायला गेली आणि केस पेटले...Video पाहून येईल अंगावर काटा...

viral video: दिवा देवाजवळ ठेवत असतानाच डाव्या हातातील दिवा या महिलेच्या केसांना लागला. आणि बघता बघता या महिलेचे केस पेटले. महिलेच्या दोन्ही हातात दिवे असल्याने तिला पेटलेले केस विझवणंही अवघड झालं

Updated: Jan 26, 2023, 07:25 PM IST
Viral Video: दिवा लावायला गेली आणि केस पेटले...Video पाहून येईल अंगावर काटा... title=

viral video of lady : सोशल मीडियावर (social media) व्हायरल होणारे व्हिडीओ (viral video) आपण खूप मोठ्या प्रमाणात  पाहत असतो, काही व्हिडीओ आपल्याला पोट धरून हसायला लावतात (funny viral video) तर काही व्हिडीओ आपल्याला काही शिकवून जातात. 

कधी कधी खूप सामान्य गोष्टी असतात ज्या आपल्या लक्षात येतं नाहीत मात्र त्यामुळे मोठ्या गोष्टी घडतात. ते आपल्या जीवावरसुद्धा बेतू शकतं. तुम्ही जर देवासमोर दिवा लावत असाल तर ही बातमी पाहा. एक महिला मंदिरात दर्शनासाठी गेली होती.(viral trending video)

देवाचं दर्शन घेतलं. पण देवासमोर दिवा लावताना ती गंभीर जखमी झाली. असं काय घडलं महिलेसोबत...(Viral video ) 

आणखी वाचा : Viral Video : काही सेकंदातच सरड्याने बदलले 7 रंग...व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

व्हायरल झालेला हा व्हिडीओ एकदा नीट पाहा. या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय एक मंदिर..मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. देवाला हार,फुले,तेल चढवून भाविक दर्शन घेत आहेत. याच वेळी येथे एक गंभीर प्रकार घडला. (shocking viral video)

हा व्हिडिओ (viral video on social media) नीट पहा. या महिलेनं तोंडाला मास्क (face mask) लावलाय आणि हातात दोन दिवे घेऊन दर्शनासाठी रांगेत उभी आहे. हातातील दिव्यांनी देवाला ओवाळल्यानंतर हे दिवे ठेवण्यासाठी ही महिला देवासमोर नतमस्तक झाली. (viral video on social media lady got burn while doing puja scarry video )

उजव्या हातातला दिवा देवाजवळ ठेवत असतानाच डाव्या हातातील दिवा या महिलेच्या केसांना लागला. आणि बघता बघता या महिलेचे केस पेटले. महिलेच्या दोन्ही हातात दिवे असल्याने तिला पेटलेले केस विझवणंही अवघड झालं. (viral trending video) केस पेटलेले असतानाच,

हातात दोन्ही दिवे घेऊन ही महिला इकडे तिकडे पळू लागली. महिला आरडाओरड करत असल्याने सगळेजण तिच्या बाजूने धावलं. लोकांनी हातातील दिवे फेकून देण्यास सांगितले त्यावेळी या महिलेनं दोन्ही दिवे फेकले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी एका महिला प्लेटमधून पाणी घेऊन आली. आणि या महिलेच्या केसांना लावून आग विझवली. पण तोपर्यंत ही महिला गंभीर जखमी झाली. हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून दिवे पेटवताना महिलांनी काळजी घ्यायला हवी.(viral video)