Viral Video: बसल्या बसल्या पेपर वाचत होता, अन् अचानक असं काय झालं की...

Man dies while reading Newspaper : संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

Updated: Nov 7, 2022, 12:59 AM IST
Viral Video: बसल्या बसल्या पेपर वाचत होता, अन् अचानक असं काय झालं की... title=
Man dies while reading Newspaper

Trending Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजक असतात, तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. अशाच व्हिडीओमधून काही गोष्टी शिकण्यास मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media Viral Video) तुफान व्हायरल होताना दिसतोय. राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. (Man dies while reading newspaper)

व्हिडिओमध्ये एक तरुण बेंचवर बसून वर्तमानपत्र वाचत बसला आहे. पण बसल्या बसल्या त्याला हृदयविकाराचा झटका (heart attack) येतो. त्यानंतर तो खाली पडताना व्हिडीओमध्ये दिसतोय. यादरम्यान त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. योगायोगानं ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Video) कैद झाली आहे. 

आणखी वाचा- GFच्या घरी गेला अन् संध्याकाळी येताच त्याचा मृत्यू झाला, घरी नेमकं काय घडलं?

संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. दिलीप कुमार (Dilip Kumar) असं या व्यक्तीचं नाव आहे. 4 नोव्हेंबर रोजी ते एका सामाजिक कार्यक्रमासाठी सुरतहून बारमेरला गेले होते. 5 नोव्हेंबर रोजी त्यांना दातदुखीचा त्रास होत होता. हे पाहण्यासाठी त्यांनी सकाळी दहाच्या सुमारास बालोत्रा​येथील क्लिनिक गाठलं.

पाहा व्हिडीओ- 

दरम्यान, बाहेर वेटिंग रूममध्ये (Viral Video) बसून वर्तमानपत्र वाचू लागले. त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि ते खाली पडले. त्यानंतर त्यांना मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण जागीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.