पाकिस्तानी चहाच्या जाहिरातीत चहा पिताना का दिसतोय भारतीय विंग कमांडर अभिनंदन? व्हिडीओ व्हायरल

 खरंच अभिनंदन यांना त्या जाहिरातीत घेतले गेले होते का? किंवा त्यांनी यामध्ये काम केले होते का? असे अनेक प्रश्न लोकांना पडू लागले आहे.

Updated: Feb 9, 2022, 06:25 PM IST
पाकिस्तानी चहाच्या जाहिरातीत चहा पिताना का दिसतोय भारतीय विंग कमांडर अभिनंदन? व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे, जेथे कधी काय व्हायरल होईल हे सांगता येणार नाही. येथे रातोरात एखादा सामान्य व्यक्ती प्रसिद्ध होऊ शकतो. सोशल मीडियावर एकदा का कोणता व्हिडीओ तुम्ही टाकलात आणि त्यामधील कंटेन्टमध्ये लोकांना इन्ट्रेस्ट असेल, तर तो व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतो. सध्या सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानमधील प्रसिद्ध चहाचा आहे. जो मोठ्याप्रमाणावर सर्वत्र शेअर केला जात आहे.

पाकिस्तानच्या या चहाच्या जाहिरातीत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान दिसत आहेत. ज्यामुळे हा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे आता खरंच अभिनंदन यांना त्या जाहिरातीत घेतले गेले होते का? किंवा त्यांनी यामध्ये काम केले होते का? हे असं कसं घडलं? असे अनेक प्रश्न लोकांना पडू लागले आहे.

विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानी लष्कराने 2 दिवसांसाठी ताब्यात घेतले होते. ज्यानंतर अभिनंदन १ मार्च रोजी भारतात परतले.

त्यानंतर त्यांचा समावेश असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला, त्यामुळे लोकांना वेगवेगळे प्रश्न पडू लागले.

या व्हिडीओमध्ये विंग कमांडर अभिनंदन चहा पिताना दिसत आहे, जे एक महिला दुर्बिनीने पाहाते आणि आपल्या नवऱ्याला सांगिते की, 'मी यांच्या प्रेमात व्यस्त आहे.'

व्हायरल व्हिडीओ

व्हिडीओ मागील सत्य काय?

हे लक्षात घ्या की Tapal चहाने ने अशी कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही, ज्यात विंग कमांडर अभिनंदन आहेत. जेव्हा या चहाची खरी जाहिरात पाहिली गेली, तेव्हा लक्षात आले की, यामध्ये विंग कमांडर अभिनंद नाही आहेत. तर व्हायरल होणारा व्हिडीओ कोणीतरी एडिट केला आहे. दोन व्हिडीओ एकत्र करुन हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे.

सत्य कसं उघड झालं?

'Tapal tea ad' ने जेव्हा गुगल सर्च केले, तेव्हा याची मुळ जाहिरात मिळाली. यामध्ये असलेली महिला आणि व्यक्ती असलेला एक व्हिडीओ समोर येतो. ज्यामध्ये तुम्हाला हे दिसेल की, ही महिला दुर्बिनमधून ज्यांना पाहात आहे, ते विंग कमांडर अभिनंदन नसुन कोणीतरी प्रेमी जोडपं आहे. ज्याच्या प्रेमात ही महिली व्यस्त असल्याचे म्हणते.

त्यामुळे हे लक्षात घ्या की व्हायरल होत असलेला विंग कमांडर अभिनंदन यांचा व्हिडीओ हा खोटा आणि एडिटेड आहे.