चोराने डेमो देत दाखवली चोरी करण्याची ट्रीक, व्हिडीओ पाहा आणि सावध व्हा

आपण विचार करणार नाही अशा मार्गांनी ते चोरी करतात.

Updated: Jan 18, 2022, 03:45 PM IST
चोराने डेमो देत दाखवली चोरी करण्याची ट्रीक, व्हिडीओ पाहा आणि सावध व्हा title=

मुंबई : दरोडा आणि चोरी हे असे गुन्हे आहेत, ज्यांची प्रकरणे जगभर रोज पाहायला मिळतात. विशेषत: चोरीबद्दल बोलायचे झाले तर, जगात अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्याबद्दल जाणून घेऊन लोक आश्चर्यचकित होतात. जगात एकापेक्षा एक असे चोर आहेत, जे चोरीचे अनोखे मार्ग अवलंबतात आणि अतिशय सफाईने चोरी करतात, ज्याची माहिती आजूबाजूच्या घरातील लोकांनाही पडत नाही. एवढेच काय तर हे चोर अशा मार्गांनी चोरी करतात की, अशी देखील चोरी होऊ शकते याचा आपण विचार देखील करु शकणार नाही.

लोक चोरांपासून संरक्षण करण्यासाठी जाड दरवाजे किंवा लोखंडी जाळ्या लावतात. परंतु तुम्हाला माहित आहे. चोर इतके हुशार असतात आणि त्यांच्याकडे अशी काही युक्ती असते की, आपण विचार करणार नाही अशा मार्गांनी ते चोरी करतात.

चोरांपासून संरक्षण करण्यासाठी लावलेल्या लोखंडी जाळ्यांमधून देखील चोर चोरी करतात. हो हे खरं आहे, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु हे खरं आहे.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चोर कशी चोरी करतात हे तुम्हाला पाहायला मिळेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चोर पोलिसांना डेमो देत आहे आणि दाखवत आहे की, लोखंडी जाळीमधून देखील चोर कसा काय कोणाच्या घरामध्ये प्रवेश करु शकतो.

या व्हिडीओमध्ये एक चोर खिडकीतून अगदी सहज घरात प्रवेश करतो. हा डेमो असला तरी पोलिसांच्या सांगण्यावरून चोर कसा चोरी करतो आपल्याला पाहायला मिळत आहे. 

व्हिडीओच्या सुरूवातीला एक पोलिस चोराची हातकडी उघडतो, जेणेकरून तो आपले 'कौशल्य' दाखवू शकेल. यानंतर चोर अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतो. तो खिडकीतील रॉडमधून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो आणि अगदी सहजतेने एका छोट्या जागेतून तो चोर घरात प्रवेश करतो.

या व्हिडीओमधील चोराचे कौशल्य फारच आश्चर्यकारक आहे. ज्यामुळे सोशल मीडियावरील लोकांना देखील हे पाहून धक्का बसला आहे.

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा मजेदार व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हा चोर खिडकीतून घुसला'. 1 मिनिट 4 सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत 5 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलं आहे.

त्याचबरोबर व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, 'एवढ्या लहानशा जागेमधून कोणी कसे प्रवेश करू शकतं', तर दुसर्‍या वापरकर्त्याने विनोदी पद्धतीने कमेंट केली, 'हे सोपे काम नाही... असे दिसते'. त्याचप्रमाणे आणखी एका युजरने 'यावर एकही केस नाही' असे लिहिले आहे.