भर पावसात Zomato बॉय ग्राहकाच्या घरी पोहोचला, दरवाजा उघडताच हैराण झाला... Video पाहून खूश व्हाल

Zomato Delivery Agent: भर पावसात एक डिलिव्हरी बॉय ऑर्डर केलेलं जेवण घेऊन एका ग्राहकाच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजाी बेल वाजवली. पण ज्यावेळी ग्राहकाने घराचा दरवाजा खोलला त्यावेळी डिलिव्हरी बॉयला आश्चर्याचा धक्का बसला. 

राजीव कासले | Updated: Sep 4, 2024, 07:53 PM IST
भर पावसात Zomato बॉय ग्राहकाच्या घरी पोहोचला, दरवाजा उघडताच हैराण झाला... Video पाहून खूश व्हाल title=

Zomato Delivery Boy: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगला व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी कौतुक केलं आहे. भर पावसात एक डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) ऑर्डर केलेलं जेवण घेऊन एका ग्राहकाच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजाी बेल वाजवली. पण ज्यावेळी ग्राहकाने घराचा दरवाजा खोलला त्यावेळी झोमॅटो (Zomato) डिलिव्हरी बॉयला आश्चर्याचा धक्का बसला. वास्तविक ज्यावेळी ग्राहकाने जेवणाची ऑर्डर केली. त्यावेळी अॅपवर ऑर्डर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयचं नाव आलं. सोबतच त्या डिलिव्हरी बॉयचा वाढदिवस असल्याचंही त्यात लिहून आलं. 

ग्राहकाला ही गोष्ट कळताच त्याने डिलिव्हरी बॉयला सरप्राईज देण्याचं ठरवलं. त्या कुटुंबाने डिलिव्हरी बॉयचा वाढदिवस साजरा करत त्याला शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून युजर्सने त्या कुटुंबाचं कौतुक केलं आहे. 

व्हायरल होणार हा व्हिडिओ गुजरातमधल्या अहमदाबाद इथला आहे. वाढदिवसाच्या दिवशीही भर पावसात हा डिलिव्हरी बॉय आपलं काम करत होता. त्याचा वाढदिवस साजरा करावा असं या कुटुंबाने ठरवलं. डिलिव्हरी बॉय जेवणाची ऑर्डर घेऊन आल्यावर कुटुंबाने दरवाजा उघडत त्याला सरप्राईज दिलं. कुटुंबातील सर्वांना डिलिव्हरी बॉयसाठी हॅपी बर्थ डे चं गाणं गायलं आणि त्याला एक छोटसं गिफ्टही दिलं. या सरप्राईजने डिलिव्हरी बॉयच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Fankaar (@iimyashshah)

हा व्हिडिओ झोमॅटो कंपनीने शेअर केला आहे. यासोबत एक कॅप्शनही दिलं आहे. यात त्यांनी म्हटलंय 'पद्धत कोणतीही असो, सर्वत्र आनंद पसरावा आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद - झोमॅटो'

व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत दोन मिलिअन व्ह्यूज मिळाले आहे. झोमॅटो आणि झोमॅटो डिलिव्हरी पार्टनरच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलंय 'इंटरनेटवर आज पाहिलेला हा सर्वोत्तम व्हिडिओ आहे' तर एका युजरने म्हटलंय 'असे व्हिडिओ पाहायला मिळाले तर इंटरनेट डाचा खर्च करायला तयार आहे' तर एका युजरने या व्हिडिओने आपला दिवस चांगला बनवल्याचं म्हटलं आहे.