Wedding Video : मुलाने आपल्या आईचे लग्न दिले लावून, पाहुण्यांसमोर असा साजरा केला आनंदाचा क्षण

Second Marriage : सोशल मीडिया (Social Media) एका जोडप्याच्या दुसऱ्या लग्नाचा एक भावनिक व्हिडिओ जोरदार व्हायरल (Viral Wedding Video) होत आहे. 

Updated: Aug 28, 2021, 11:33 AM IST
Wedding Video : मुलाने आपल्या आईचे लग्न दिले लावून, पाहुण्यांसमोर असा साजरा केला आनंदाचा क्षण title=
Pic Courtesy : Instagram

मुंबई : Second Marriage : सोशल मीडिया (Social Media) एका जोडप्याच्या दुसऱ्या लग्नाचा एक भावनिक व्हिडिओ जोरदार व्हायरल (Viral Wedding Video) होत आहे. वधू - वरांचे लग्न वधुच्या मुलाने लावून दिले आहे. या लग्नाची आता जोरदार चर्चा होत आहे.

काळानुसार बदलत राहणे फार महत्वाचे आहे, यात शंका नाही. जगात होत असलेल्या बदलांची ही या निमित्ताने झलक सोशल मीडियावर स्पष्ट दिसत आहे. इन्स्टाग्रामवर  (Instagram) व्हायरल होणारा लग्नाचा व्हिडिओ अशीच एक बाब सांगत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही  भावनिक व्हाल. (Emotional Video)

मुलाने स्वतःच पुढाकार घेत त्याच्या आईचे लग्न लावून दिले. दुसरे लग्न (Second Marriage) करणे आता समाजात निषिद्ध आहे. असे बरेच लोक आहेत. जे घटस्फोटानंतर किंवा त्यांच्या जोडीदाराच्या निधनानंतर दुसर्‍याशी लग्न करून आपल्या आयुष्यात पुढे जातात. सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर एका लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये (Bride Groom Video), एक मुलगा त्याच्या आईचे दुसरे लग्न लावून देताना दिसत आहे.  (Kid Video)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by UnShaadi (@unshaadi)

सर्वांसमोर Kiss करायला लावला

जर तुम्ही कधी ख्रिश्चन विवाह  (Christian Wedding) पाहिला असेल, तर तुम्हाला त्याच्या रीतिरिवाजांबद्दल बऱ्याच प्रमाणात माहिती असेल. या विवाहाचा समारोपही त्याच विधींनी झाला आहे. वधू पांढऱ्या गाऊनमध्ये आणि वर पँट सूटमध्ये दिसत आहे. वधूच्या मुलाने काळ्या रंगाचा Tuxedo घातला आहे. व्हिडिओमध्ये मुलगा चर्चच्या फादर यांच्याप्रमाणे हातातील माईकवर या दोघांच्या लग्नाच्या आनंदाची बातमी सांगत आहे. मग तो काकांना म्हणजेच वराला त्याच्या आईला 'किस' करायला सांगतो.

लोकांना हा बदल पसंत पडला

बऱ्याचवेळा लोक त्यांच्या मुलांमुळेच दुसरे लग्न (Second Marriage) करणे टाळतात. अशा परिस्थितीत, हा व्हिडिओ  (Unique Video) प्रत्येकासाठी एक चांगले उदाहरण घालून देत आहे. आतापर्यंत 70 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. कमेंट बॉक्समधील प्रतिक्रिया पाहिल्यानंतर लोक जोडप्याचे तसेच मुलाचे कौतुक करत आहेत आणि शुभेच्छा देत आहेत.