Vodafone Idea FPO: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. टेलीकॉम सेक्टरमधील कर्जात बुडालेली कंपनी वोडाफोन आयडीयाने देशातील सर्वात मोठी फॉलो ऑन ऑफर आणण्याची तयारी केली आहे. कंपनीचा एफपीओ याच आठवड्यात म्हणजे गुरुवारी 18 एप्रिल रोजी खुलणार आहे. यामध्ये गुंतवणूकदार आगामी 22 एप्रिलपर्यंत बोली लावू शकणार आहेत. या एफपीओसाठी कंपनीने 10 ते 11 रुपयांचे प्राइस बॅंड ठरवले आहे.
वोडाफोन आयडिया लिमिटेड (Vodafone Idea Limited (VIL) चा एफपीओ यशस्वी झाला तर देशातील इतिहासात सर्वात मोठा एफपीओ ठरेल. याआधी जुलै 2020 मध्ये येस बॅंकने 15 हजार कोटींचा एफपीओ आणला होता. तो यशस्वी ठरला. याप्रमाणे अदानी एंटप्राइजने 20 हजार कोटी रुपयांचा एफपीओ आणला होता. हा एफपीओदेखील यशस्वी राहीला होता. पण याला पूर्णपणे सब्स्क्राइब करण्यात आले होते. पण हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर हा एफपीओ परत घेण्यात आला होता.
वोडाफोन आयडीया एफपीओसाठी 10 ते 11 रुपये प्रति शेअर प्राइस बॅंड फिक्स करण्यात आले आहे. या एफपीओसाठी लॉट साइज 1298 शेअर्सची असेल. याचा अर्थ रिटेल इन्व्हेस्ट्रस कट ऑफ प्राइसवर बीड करत असतील तर त्यांना कमीत कमी 14 हजार 278 रुपये गुंतवावे लागतील. यावर इतक्याच शेअरनुसार बोली लावावी लागेल.
वोडा आयडिया एफपीओसाठी एंकर इन्व्हेस्टर्सना 16 एप्रिलपर्यंत बिड करण्याची संधी मिळेल. यानंतर रिटेल सहित इतर श्रेणीचे इन्व्हेस्टर्सना 18 ते 22 एप्रिल दरम्यान बोली लावण्याची संधी मिळणार आहे.