वॉशिंगमशीन घरात 'या' ठिकाणी ठेवू नका, ते लवकर होईल खराब; होऊ शकते मोठे नुकसान

Washing Machine Using Tips : आजकाल अनेकांच्या घरात कपडे धुण्याचे मशीन पाहायला मिळते. जर तुम्हाला वॉशिंगमशिन जास्त वेळ चालवायचे असेल तर ते चुकूनही घरात अशा ठिकाणी ठेवू नका की, ते खराब होईल. एकदा का वॉशिंगमशीन बिघडले की तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागेल.   

सुरेंद्र गांगण | Updated: May 19, 2023, 09:14 AM IST
वॉशिंगमशीन घरात 'या' ठिकाणी ठेवू नका, ते लवकर होईल खराब; होऊ शकते मोठे नुकसान  title=

How To Protect Washing Machine From Damage : आपल्या घरातील वॉशिंगमशिनला धोका पोहोचण्यापासून वाचवायचे असेल तर काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. आजकाल टीव्ही-फ्रिजप्रमाणे वॉशिंगमशिनही घरातील अत्यावश्यक वस्तू झाली आहे. आज वॉशिंगमशिनशिवाय कपडे धुण्याचा विचार कोणी विचार करत नाही. हाताने कपडे धुणे अनेकांना अवघड काम वाटते. त्यामुळे त्यांनी वॉशिंगमशीन नसेल तर याची भीती वाटू लागली आहे. वॉशिंगमशीन बिघडले की महिलांचा त्रास वाढतो. अनेक लोक तक्रार करतात की वॉशिंगमशीन काही काळानंतर बंद पडते. हे काही प्रकरणांमध्ये खरे असू शकते परंतु पूर्णपणे नाही. वास्तविक, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांप्रमाणे, आपल्याला वॉशिंगमशीनची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. तसे केले नाही तर मशीन बिघडायला वेळ लागत नाही. 

वॉशिंगमशिन कसे वापरावे?

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही वॉशिंगमशीन (How To Use Washing Machine)  खरेदी करता, तेव्हा त्यापूर्वी ते घरात ठेवण्यासाठी जागा निश्चित करा. यासाठी घरामध्ये अशी जागा शोधली पाहिजे, जी पक्की असेल. म्हणजेच ते काँक्रीट किंवा दगडाचे बनलेले असते. असे करण्यामागे एक खास कारण आहे. वास्तविक, जेव्हा वॉशिंगमशिनमध्ये कपडे धुतले जातात किंवा वाळवले जातात तेव्हा त्याचे कंपन खूप वेगवान होते. त्यामुळे ती थरथरु लागते. अशा स्थितीत जर ते पक्क्या जागेवर ठेवले नाही तर ते पडण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे त्याचे काही पार्ट तुटण्याची शक्यता असते. 

वॉशरुममध्ये मशिन ठेवू नये, कारण...

दुसरी गोष्ट म्हणजे वॉशिंगमशिन कोपऱ्यात योग्य ठिकाणी ठेवावे. असे केल्याने मशिनला जास्त हादरे बसणार नाहीत. पुन्हा पुन्हा हादरण्यापासून वाचते. तसेच त्यावर घाण साचत नाही आणि इतर वस्तूही विनाकारण त्यावर ठेवल्या जात नाहीत. चुकूनही वॉशिंगमशिन वॉशरुममध्ये ठेवू नये. याची विशेष काळजी घ्यावी. याची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे येथे खूप निसरडापणा असतो. ज्यामुळे वॉशिंगमशीन पडू शकते. दुसरे म्हणजे, तेथे सतत पाण्याचा वापर केल्यामुळे, मशीनचे भाग ओले होण्याची शक्यता असते, ज्यामुळे ते लवकर खराब होऊ शकते. 

कपडे धुण्यापूर्वी हे काम जरुर करा

जेव्हा तुम्ही वॉशिंगमशिनमध्ये कपडे धुता  ते नीट तपासा. कपड्यांचे खिसे तपासा की त्यात सेफ्टी पिन, नाणे किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू आहे का? या गोष्टी खिशात असल्याने इतर कपड्यांचे नुकसान होऊ शकते. तसेच वॉशिंग मशिनच्या भागांचे नुकसान होते. 

वॉशिंगमशिनच्या क्षमतेनुसार कपडे घाला

वॉशिंगमशिन जास्त काळ चालवायचे असेल तर त्यात त्याच्या क्षमतेनुसार कपडे घालावेत. मशिनला कपड्यांमध्ये पूर्णपणे भरुन ठेवण्याऐवजी त्यात फक्त अर्धेच कपडे घाला, जेणेकरून मशीनला फिरवायला सोपे जाईल आणि ते तुमचे कपडे व्यवस्थित स्वच्छ करु शकेल. मशीनमध्ये एकाच वेळी जास्त कपडे टाकल्यास ते लवकर खराब होण्याची शक्यता असते.  

महिन्यातून एकदा मशीन अशी स्वच्छ करा !

महिन्यातून किमान एकदा, वॉशिंग मशीनचे ड्रम कोमट पाण्याने भरा आणि त्यात ब्लीच मिसळा आणि ते रिकामे चालवा. असे केल्याने मशीन स्वच्छ होईल आणि त्यात साचलेली धूळ आणि इतर घाण काढली जाईल. अशा प्रकारे मशीन साफ ​​करण्याचे कारण म्हणजे कपडे धुतल्यानंतर वॉशिंग मशीनच्या छोट्या छिद्रांमध्ये धागे, डिटर्जंट पावडर यांसारख्या बारीक गोष्टी अनेकदा अडकतात. त्यामुळे त्यांच्यात बुरशीची शक्यता वाढते. यामुळे तुमचे मशीनही जाम होऊ शकते.