दोन गटांत गोळीबार, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

लुधियाना शहरात भरदिवसा दोन गटांत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबाराचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 21, 2018, 03:53 PM IST
दोन गटांत गोळीबार, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद title=
Image: Screen Grab

नवी दिल्ली : लुधियाना शहरात भरदिवसा दोन गटांत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबाराचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

न्यूज एजन्सी एएनआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, लुधियानातील सेक्टर-३२ मध्ये चंडीगढ रस्त्यावर दोन गटांत गोळीबार होत आहे. या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाला. 

पंजाबमध्ये होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांना या गोळीबाराच्या घटनेशी जोडून पाहीलं जात आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात पोलिसांना अर्लट राहण्यास सांगितलं आहे. त्यातच ही गोळीबाराची घटना समोर आली आहे. 

२० फेब्रुवारी रोजी घडली घटना 

CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एका टोळीतील काही तरुण बाईक्सवर येतात. त्यांच्यावर दुसऱ्या गटाचे तरुण धारदार हत्याराने हल्ला करतात. हल्ला करुन हे तरुण पळ काढतात.

पोलीस करतायत अधिक तपास

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर समोरील गटाने केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला. ही घटना २० फेब्रुवारी रोजी घडल्याचं बोललं जात आहे. 

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.