नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीमध्ये बोलत असतांना म्हटलं की, "आम्ही सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि हिंसेच्या वृत्तीचं समर्थन नाही करत.".
मोहन भागवत यांनी हरिद्वार येथे संत परिषदेत बोलतांना सोमवारी म्हटलं होतं की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बंदुकीचा धाक दाखवून किंवा लोभ दाखवून कोणालाही हिंदु नाही बनवत. पण लोकांना स्वत:च हिंदू धर्मात यायचं असतं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी हे देखील म्हटलं की, हिंदु हा जगातील सर्वात जुना धर्म आहे. इतर सर्व संप्रदाय आहेत. सोमवारी, भागवत यांनी आपल्या वाढदिवशी हरिद्वार येथे गंगा पूजा केली.