लग्नात नवरदेवाने नववधुसोबत केला विचित्र प्रकार, वऱ्हाडी चांगलेच भडकले : VIDEO

हे लग्न आहे का? सोशल मीडियावरून विचारला जातोय प्रश्न

Updated: Aug 11, 2021, 11:52 AM IST
लग्नात नवरदेवाने नववधुसोबत केला विचित्र प्रकार, वऱ्हाडी चांगलेच भडकले : VIDEO  title=

मुंबई : लग्न म्हटलं की किस्से हे आलेच. या लग्नांमध्ये चर्चा असते ती नववधु आणि नववराची. जेव्हा या दोघांनी नोकझोक होते, खटके उडतात तेव्हा या सगळ्याची मजा काही वेगळीच असते. तसेच लग्नातील काही परंपरा या देखील वेगळ्या असतात. कधी कधी आपण या विधी का करतो? याची माहिती नवं दाम्पत्याला नसते पण तरी देखील ते करत असतात. असाच एक विधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 

भांगेत कुंकू भरणं ही काही ठिकाणची महत्वाची पद्धत मानली जाते. अनेकदा लग्न झाल्यानंतर त्या स्त्रीच्या कपाळातील भांगेत कायम कुंकू असणं आवश्यक असते. पण हेच कुंकू लावत असताना वराने नववधुचा संपूर्ण चेहरा खराब केला आहे. या विधीवर तेथे उपस्थित असलेल्या अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by TECONICAA IT SOLUTION (@lovkesh_gupta)

भर मंडपात नवरदेव नववधुच्या भांगात कुंकू भरत होता. यावेळी त्याने हातात भरपूर कुंकू घेतलं आणि अगदी तिच्या नाकापासून कपाळापर्यंत तब्बल 7 वेळा हात फिरवला. यामुळे नववधुच्या नाकातही कुंकू गेल्याची शक्यता आहे. हा खरंच एका विधीचा भाग होता की नववधुला त्रास देण्याची पद्धत? याबाबत काही कळलेलं नाही पण हा प्रकार नक्कीच त्रास दायक आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ लवकेश गुप्ता यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की हे लग्न कुठे आहे, भाऊ. या व्हिडिओमध्ये... यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.