मंडप सजला, अक्षता पडल्या नवरदेव हार घालणार इतक्या स्टेजवर तिसऱ्याची एन्ट्री, पुढे काय घडलं पाहा

हा व्हिडीओ खरोखरच एक आश्चर्यकारक व्हिडीओ आहे.

Updated: Dec 25, 2021, 05:35 PM IST
मंडप सजला, अक्षता पडल्या नवरदेव हार घालणार इतक्या स्टेजवर तिसऱ्याची एन्ट्री, पुढे काय घडलं पाहा title=

मुंबई : इंटरनेटच्या दुनियेत कधी कोणते व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतील हे सांगणं फार कठीण आहे. यामधील काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात, तर काही व्हिडीओ आपल्यासमोर उदाहरण ठेवतात. आपण असे व्हिडीओ आवडीने पाहातो आणि आपल्या मित्रांना देखील ते शेअर करतो. सोशल मीडिया हे असं जग आहे, जेथे आपल्याला सर्वप्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळणार. सध्या लग्नाचा सिझन असल्यामुळे आपल्याला सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडीओ किंवा फोटो पाहायला मिळतात.

सध्या सोशल मीडियावरती लग्नातील एक व्हिडीओ धुमाकुळ घालत आहे आणि हा व्हिडीओ खरोखरच एक आश्चर्यकारक व्हिडीओ आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लग्नाचा कार्यक्रम पार पडत आहे. नववधु आणि नवरदेव स्टेजवरती उभे असतात. त्यादरम्यान सर्व नातेवाईक त्यांच्या अवतीभवती उभे राहून नववधू आणि नवरदेव एकमेकांना वरमाला घालण्याची वाट पाहात आहेत.

सगळेच लोकं या क्षणाचा आनंद घेण्यासाठी तेथे उभे असतात. परंतु तेवढ्या एका तिसऱ्याच व्यक्तीची एन्ट्री होते आणि हा व्यक्ती असं काही करतो जे पाहून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल.

हा तरुण त्या नववधूचा बॉयफ्रेंड असावा असे सांगण्यात येत आहे. या तरुण वरमालाच्या वेळी रुबाबात स्टेजवरती येतो आणि नववधूच्या भांगात सिंदूर भरुन मोकळा होतो. सुरूवातीला लोकांना काय सुरू आहे हे कोणाला कळत नाही. परंतु नंतर सगळे लोकं त्याला थांबलण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे स्टेजवरती लोकांमध्ये मारामारी सुरू होते.

हा व्हिडीओ आतापर्यंत वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि नेटिझन्सही त्यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.