मुंबई : थोडं वेळेत प्लॅनिंग केलं तर आजकाल विमानप्रवासही सामान्यांच्या आवाक्यात आला आहे.
विमानकंपन्यांमध्येही ग्राहकांना आकर्षित करण्याची तीव्र स्पर्धा सुरू आहे. अनेकदा तुम्ही प्रवासादरम्यान विमान पाहू शकता पण वैमानिक काय काय? इतर क्रू आणि कर्मचार्यांचं व्यवस्थापन कसं असतं तसेच प्रवासादरम्यान विमानात काय काय होतं ही पडद्यामागची गंमत फार क्वचितच लोकांना ठाऊक असते. म्हणूनच Reddit वर झालेल्या एका ऑललाईन चर्चेतून समोर आलेल्या या 8 खास बाबी तुमच्यासाठी ....
प्रवाशांचं जेवणं पायलटला नसतं ...
अनेकदा तिकिटाच्या पैशामध्येच प्रवाशांच्या जेवणाचा खर्चदेखील असतो. पण प्रवाशांसाठी असलेलं जेवण पायलटसाठी नसतं. पायलेट्सच्या आरोग्याचा विचार करता त्यांच्यासाठी खास जेवणाची सोय असते.
पायलटपण झोपतात -
पायलट झोपतात... हे वाचून तुम्हांला आश्चर्य वाटतं ना ? पण अनेकदा लांबच्या पल्ल्यावर जाताना पायालट एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर थोडावेळ आराम करतात. या वेळेस विमान ऑटो पायलट मोडवर असतं. तसेच पायलटच्या साथीला असलेला दुसरा पायलट एकमेकांना सांभाळून घेतो.
ऑक्सिजन मास्क १५ मिनिटं काम करतो
विमानात हवेचा दाब कमी झाल्यास ऑक्सिजन कमी होतो, परिणामी इमरजन्सीच्या वेळेस ऑक्सिजन मास्क खाली येतात. मात्र हे मास्क १५ मिनिटंचं काम करतात. त्यानंतर हायपर व्हेंटिलेशन स्थिती तयार होते.
वापरलेले हेडफोन
विमान गाणी किंवा चित्रपट पाहण्याची सोय असते. अशावेळेस प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले हेडफोन्स तुमच्यासमोर ठेवले जातात. हे हेडफोन्स अनेकदा वापरलेले असतात. त्यामुळे कानांमध्ये इंफेक्शन होण्याची शक्यता असते.
कॉफी टाळा
विमानात कॉफी कंटेनर योग्यरित्या स्वच्छ केले जात नाहीत अशी माहिती काही कर्मचार्यांनी दिली आहे. त्यामुळे विमानात कॉफी पिणं टाळा.
विमानातील अनेक नट्स खुले असतात
विमान आकाशात झेपावताना 1-2 नव्हे तर अनेक नट बोल्ड्स खुले असतात. हे पायलटलादेखील ठाऊक असते. विमानाच्या राईट विंगचे दोन स्क्रू नेहमी खुले असतात. यामुळे विमान फिरवणं सोपं असतं.
ट्रे टेबल
ट्रे टेबलचा वापर अन्न ठेवण्यासाठी, लॅपटॉप ठेवण्यासाठी किंवा अगदी लहान मुलांचे डायपर बदलण्यासाठीदेखील केला जातो. त्यामुळे ट्रे सोबतच इतर काही वस्तूंचा वापर करण्यापूर्वी ते स्वच्छ आहेत का ? हे नीट तपासूनच त्याचा वापर करा.
लाईफ जॅकेट
सीटच्या खाली लाईफ़ जॅकेट आहे का ? याची तपासणीअवश्य करूनपहा. अनेकदा ते सीट्च्या खाली योग्य ठिकाणी नसते.
उशा किंवा चादरींची सफाई
विमानात मिळणार्या उशा आणि चादरी तुम्हांला स्वच्छ वाटतं असले तरीही ते पुरेसे साफ नसतात. कारण त्यामध्ये कीटाणूंचा अदृश्य वावर असतो. परिणामी तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकते.