अमित शाहांचा प. बंगालमध्ये इतक्या जागा जिंकण्याचा दावा

आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये भाजपला कमळ फुलवण्यात यश आलं नाही या निवडणुकीत तरी येईल?

Updated: Feb 19, 2021, 09:24 PM IST
अमित शाहांचा प. बंगालमध्ये इतक्या जागा जिंकण्याचा दावा title=

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वारे वेगानं वाहात आहेत. प्रचाराची रणधुमाळी रंगात आली आहे. भाजप विरुद्ध तृणमूल अशी टफ फाईट असताना आता अमित शाहांनी भाकीत केलं आहे. त्यांच्या या भाकितामुळे चर्चेला उधाण तर आलंच पण या निवडणुकीकडे खास सर्वांचं लक्ष असणार आहे. 

पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला 200 हून अधिक जागा मिळतील असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. सोनार बांग्लाचं भाजपचं स्वप्न साकार आता साकार होणार आहे. असा दावा अमित शाह यांनी केला आहे. 

झी मीडियाला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये अमित शाह यांना पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या किती जागा येतील याबाबत प्रश्न विचारला. लोकसभेलाही भाजपला पश्चिम बंगालमध्ये थोड्या फरकानं पराभवाचा सामना करावा लागला. आता पुन्हा एकदा भाजपने कंबर कसली आहे. विधानसभेसाठी पश्चिम बंगालमध्ये भाजपचं कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोर लावला आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये सतत्यानं खटके उडत असतात. आतापर्यंत कम्युनिस्ट आणि तृणमूलने पश्चिम बंगाल हातातून जाऊ दिलं नाही. त्यामुळे आता भाजपला तिथे यश मिळवता येणार का? भाजपला आजपर्यंत पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलवण्यात यश आलं नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजपचे प्रयत्न सुरू असतानाच अमित शाहांनी जे भाकीत वर्तवलं ते सत्यात उतरणार का? याची उत्सुकता सर्वांना आहे. 

पश्चिम बंगालमध्ये साधारण एप्रिलदरम्यान विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या तारख्या येत्या आठवड्यात जाहीर होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे आता कधीही काबीज न करता आलेला पश्चिम बंगालचा गड जिंकण्यात भाजपला यश येणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.