हॉटेलमध्ये चेक-इन करताना थेट आधारकार्ड दाखवत असाल तर वेळीच सावध व्हा! नाहीतर...

Masked Aadhaar Card: भटकंती किंवा लहानशी सहल असो, एखाद्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलं असता तिथं असणाऱ्या हॉटेलमध्ये राहणाला अनेकांचीच पसंती.   

सायली पाटील | Updated: Sep 5, 2024, 12:21 PM IST
हॉटेलमध्ये चेक-इन करताना थेट आधारकार्ड दाखवत असाल तर वेळीच सावध व्हा! नाहीतर... title=
What is Masked Aadhaar Card know its usage

Masked Aadhaar Card: सहलीसाठी किंवा एखाद्या ठिकाणी वीकेंडचा मुक्काम करण्यासाठी गेलं असता एखादा व्हिला, हॉटेल किंवा मग लॉज अशा पर्यायांची निवड केली जाते. मुक्काम कुठंही असो, तिथं मालकाकडून कायमच मुक्कामासाठी कायमच पर्यटकांकडून काही पुरावे जमा केले जातात. यामध्ये सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो तो म्हणजे आधार कार्डचा. पण, हल्लीच्या दिवसांमध्ये या पुराव्यांच्या माध्यमातून खासगी माहिती लीक होण्याचाही धोका अधिक वाढला आहे. 

आधार कार्डवर असणारी माहिली लीक करत त्या माध्यमातून बँक खात्यांवर डल्ला मारण्याची अनेक प्रकरणं मागील काही वर्षांमध्ये वाढली आहेत. यावर उपाय म्हणून कायमच मास्क आधार कार्ड बनवून घेण्याचा सल्ला दिला जातो. ज्याचा वापर हॉटेल चेक-इनमध्ये सहज करता येऊ शकतो. 

मास्क आधार कार्ड म्हणजे नेमकं काय? 

मास्क आधार कार्ड हे प्रत्यक्षातील आधार कार्डचं एक रुप असून यामध्ये तुम्ही तुमच्या आधार कार्डवर असणारे 8 आकडे लपवू शकता. थोडक्यात आधार कार्डवरील फक्त शेवटचे 4 आकडेच दर्शनीय राहतील. मास्क आधार कार्डच्या मदतीनं तुम्ही तुमचं मूळ आधार कार्ड आणि खासगी माहिती सुरक्षित ठेवू शकता. किंबहुना मास्क आधार कार्डही पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जात असल्यामुळं तुम्हाला अनेक ठिकाणी मूळ आधार कार्ड दाखवण्याची गरज भासणार नाही. 

हेसुद्धा वाचा : एकाच महिलेच्या नावावरून 30 फॉर्म; शिंदे सरकारला खडबडून जाग, आता 'लाडकी बहीण' योजनेचा अर्ज... 

How to download masked Aadhaar Card

  • सर्वप्रथम UIDAI च्या संकेतस्थळाला भेट द्या 
  • 'मेरा आधार'वर क्लिक करा 
  • आता स्वत:चा आधार क्रमांक देऊन तिथं कॅप्चा भरा 
  • मोबाईलवर आलेलाय OTP द्या 
  • वेरिफाय केल्यानंतर मास्क आधार कार्डवर क्लिक करून ते डाऊनलोड करा 

कसं वापराल मास्क आधार कार्ड? 

हॉटेलमध्ये चेक इन किंवा चेक आऊट करताना तुम्ही या मास्क आधार कार्डचा वापर करू शकता. यामुळं तुमची खासगी माहिती सुरक्षित राहते. इतकंच नव्हे, तर प्रवास करताना विमानतळावरही तुम्हाला आधार कार्डऐवजी मास्क आधार कार्ड दाखवण्याची मुभा असल्याचं सांगितलं जातं.