EPFO: 12 अंकी नंबर विसरलात, पेन्शन मिळवण्यात येतंय अडचण! असा मिळवाल PPO क्रमांक

How To Get PPO Number: नोकरी करणाऱ्या व्यक्ती ईपीएफओचा मेंबर असतो आणि प्रत्येक महिन्यात पगारातील ठरावीक रक्कम ईपीएफ खात्यात जमा होते. यापैकी 8.33 टक्के रक्कम ही पेन्शन खात्यात जाते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने एखाद्या ठिकाणी 10 वर्षांहून अधिक नोकरी केली असेल तर त्या व्यक्तीला पेन्शन मिळते.

Updated: Dec 13, 2022, 01:37 PM IST
EPFO: 12 अंकी नंबर विसरलात, पेन्शन मिळवण्यात येतंय अडचण! असा मिळवाल PPO क्रमांक title=

How To Get PPO Number: नोकरी करणाऱ्या व्यक्ती ईपीएफओचा मेंबर असतो आणि प्रत्येक महिन्यात पगारातील ठरावीक रक्कम ईपीएफ खात्यात जमा होते. यापैकी 8.33 टक्के रक्कम ही पेन्शन खात्यात जाते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने एखाद्या ठिकाणी 10 वर्षांहून अधिक नोकरी केली असेल तर त्या व्यक्तीला पेन्शन मिळते. ईपीएस 95 पेन्शन स्कीमअंतर्गत निवृत्तीनंतर म्हणजेत वयाच्या 58 वर्षानंतर पेन्शनचा लाभ मिळू शकतो. पेन्शनसाठी ईपीएफओकडून पीपीओ (Pension Payment Order) नंबर जारी केला जातो. हा नंबर 12 अंकी असतो. पेन्शनसाठी दावा करताना हयातीचा दाखला जमा करताना पीपीओ क्रमांकाची आवश्यकता असते. पण हा नंबर तुमच्या लक्षात नसेल तर मात्र अडचण येऊ शकते.  कर्मचारी भविष्य निधी (EPF) निगडीत बँक खाते आणि पीएफ नंबरचा वापर करून पीपीओ नंबर पुन्हा मिळवू शकता. चला जाणून घेऊयात प्रोसेस...

पीपीओ नंबरची आवश्यकता का आहे?

पीएफ खातं एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करायचं असल्यास आपल्याला पीपीओ नंबरची आवश्यकता असते. पासबुकवर पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर असायला हवा. पासबुकवर हा नंबर नसल्यास अडचण येऊ शकते. दुसरीकडे पेन्शन निगडीत कोणतीही तक्रार करायची असल्यास पीपीओ नंबर देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ऑनलाईन पेन्शन ट्रॅक करण्यासाठी पीपीओ नंबरची आवश्यकता असते. 

बातमी वाचा- PF Withdrawal: ऑनलाइन पीएफचे पैसे काढल्याने होतात हे फायदे, जाणून घ्या

पीपीओ नंबर कसा मिळवाल?

  • तुम्हाला तुमची पेन्शन स्थिती तपासायची असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइट www.epfindia.gov.in ला भेट द्यावी लागेल.
  • होम पेजवर जाऊन ऑनलाइन सेवांमधील 'पेन्शनर्स पोर्टल' वर जा. येथे तुम्हाला डाव्या साईटवर Know Your Pension Status हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला डॅशबोर्डच्या डाव्या बाजूला Know Your PPO No. ऑप्शन दिसेल.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचे ईपीएफ लिंक केलेले बँक खाते किंवा पीएफ क्रमांक टाकून ते सबमिट करावे लागेल.
  • सबमिट केल्यानंतर, तुमचा पीपीओ क्रमांक तुमच्या समोर येईल.