पाकिस्तानने पकडलेल्या जवानाला काहीच नाही होणार, जाणून घ्या का?

पाहा काय आहेत नियम...

Updated: Feb 28, 2019, 10:12 AM IST
पाकिस्तानने पकडलेल्या जवानाला काहीच नाही होणार, जाणून घ्या का?  title=

नवी दिल्ली : आज भारताच्या सीमा भागात पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना उत्तर देण्यासाठी भारताने देखील आपले फायटर जेट पाठवले. त्यानंतर पाकिस्तानचं विमान भारतीय वायुदलाच्या जवानांनी पाडलं. पण या दरम्यान भारताच्या एक लढाऊ विमानावर पाकिस्तानने हल्ला केला. पाकिस्तानचा असा दावा आहे की, भारताचा एक पायलट त्यांच्या ताब्यात आहे. भारत सरकारने एक पायलट बेपत्ता असल्याचं म्हटलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी म्हटलं की, 'भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने देखील अॅक्शन घेतली. त्यानंतर भारताने कारवाईत पाकिस्तानचं एक विमान पाडलं. या कारवाईमध्ये भारताचं एक विमान देखील पडलं. ज्यामध्ये भारताचा एक पायलट बेपत्ता आहे. त्याचा तपास करत आहोत.' पण पाकिस्तानने केलेल्या दाव्यानुसार जर भारताचा पायलट जर खरंच त्यांच्या ताब्यात असेल तर मग आता त्याच्या सोबत काय केलं जाऊ शकतं.

आंतरराष्ट्रीय जिनेवा करारानुसार काही नियम बनवण्यात आले आहेत. यानुसार युद्धादरम्यान पकडल्या गेलेल्या जवानांना धमकावलं नाही जावू शकत किंवा त्यांचा अपमान नाही केला जावू शकत. ताब्यात असलेल्या जवानाबाबत जनतेत उत्सूकता देखील तयार नाही केली जावू शकत.

जिनेवा करारानुसार युद्धात पकडलेल्या जवानावर खटला चालवला जातो किंवा युद्ध झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवलं जातं. जवानाला पकडल्यानंतर त्याचं नाव, सैन्यपद आणि त्याचा नंबर दुसऱ्या देशाला सांगितला जातो.

आतापर्यंत तसं अनेकांनी जिनेवा कराराचं उल्लंघन देखील केलं आहे. जिनेवा करार हा दुसरे विश्वयुद्धानंतर 1949 मध्ये तयार करण्यात आला. याचा मुख्य उद्देश मानवी मुल्य जपण्यासाठी आहे.

भारतीय वायुदलाच्या एका जवानाला अटक केल्याचं पाकिस्तान सैन्यदलाचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दावा केला आहे. 'सीमारेषा ओलांडणाऱ्या दोन भारतीय विमानांना पाकिस्तान सेनेनं लक्ष्यावर घेतलं. एका भारतीय वैमानिकाला अटक करण्यात आली आहे' असं गफूर यांनी बुधवारी सकाळी ट्विट केलं होतं.