गप्पा मारता मारता अचानक जमिनीनं सर्वांना गिळलं, VIDEO पाहून थरकाप उडेल

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून नक्की काय घडलं असेल असा प्रश्न लोकांना पडलाय

Updated: Apr 5, 2022, 11:35 AM IST
गप्पा मारता मारता अचानक जमिनीनं सर्वांना गिळलं, VIDEO पाहून थरकाप उडेल  title=

Viral Video : सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ असतात जे  पाहून अनेकवेळा आपल्याला धक्का बसतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्सना नक्की काय घडलं असा प्रश्न पडला आहे.

ट्विटरवर एका व्यक्तीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत फुटपाथवर काही लोकं उभी असलेली दिसतायत. एक व्यक्ती बसलेली असून एक व्यक्ती फोनवर बोलताना दिसत आहे. 

फोनवर बोलणारा व्यक्ती बोलता बोलता थोडा लांबवर जातो, तितक्यात तिथली जमीन खचते आणि तो व्यक्ती त्यात पडतो, त्याला वाचवायला आलेले आणखी दोन जणही त्या खड्ड्यात पडतात. काही क्षणातच आजूबाजूची जमीनही खचताना दिसत आहे.

साधारण भूकंपामुळे जमीनीला भेगा पडतात आणि काहीवेळा जमीन खचली जाते. पण या व्हिडिओत असा कोणताही प्रकार घडलेला नाही. परिस्थिती अगदी सामान्य असतानाही जमीन अचानक खचल्याचं दिसत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबतची माहिती मिळालेली नाही.