पैसे वाचवणारी बातमी | जर RBI ने रेपो रेटमध्ये बदल केले नाहीत, तर लोनवाल्यांनी काय करायचं?

रिझर्व्ह बँकेच्या दरात बदल न करण्याच्या निर्णयाचा लाभ कर्ज घेणारे कसे घेऊ शकतात? त्याचा फायदा कर्ज घेणाऱ्या लोकांना कसा होणार? जाणून घ्या.

Updated: Jun 6, 2021, 02:54 PM IST
पैसे वाचवणारी बातमी | जर RBI ने रेपो रेटमध्ये बदल केले नाहीत, तर लोनवाल्यांनी काय करायचं? title=

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सलग सातव्यांदा रेपो दरात कहीही बदल केला नाही. सध्या रेपो दर 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात बदल केलेला नाही आणि त्यामुळे मग बँका देखील कर्जावरील व्याज दरात वाढ करणार नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या दरात बदल न करण्याच्या निर्णयाचा लाभ कर्ज घेणारे कसे घेऊ शकतात? त्याचा फायदा कर्ज घेणाऱ्या लोकांना कसा होणार? जाणून घ्या.

रिजर्व बँक ऑफ इंडिया ने 1 ऑक्टोंबर 2019 ला होम लोनसाठी फ्लोटिंग इंट्रेस्ट रेट च्या नियमांची घोषणा केली होती. बहुतेक बँका रेपो दराला कर्जाचे मापदंड मानतात. त्यामुळे मग रेपो रेट न वाढल्यामुळे कर्जदारांना स्वस्त कर्जाचा लाभ मिळत राहील. यामुळे गृह कर्जधारकांच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही.

जर तुमचे कर्ज 5 वर्ष जुने असेल, तर ते बेस रेट आधारित आहे का ते तपासणे महत्वाचे आहे. जर तो अजूनही बेस रेटवर आधारित असेल, तर तो EBRवर ट्रांसफर करा . यासाठी तुम्हाला स्विचिंग चार्ज जमा करावा लागेल. जर तुमची बँक ही सुविधा देत नसेल, तर बँक ट्रांसफर करता येईल आणि त्यासाठी फक्त प्रोसेसिंग फी जमा करावी लागेल.

कार कर्जाबद्दल बोलायचे झाले तर, हे सहसा 5-7 वर्षेासाठीचे असते. जर कोणी नवीन कारसाठी कर्ज घेत असेल, तर ते फिक्स्ड व्याज दरावर उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत, जिथे तुम्हाला बाजारात सर्वात स्वस्त कर्ज मिळेल तेथून कर्ज घ्या. कार कर्जाचा व्याज दर बदलत नाही, त्यामुळे ईएमआय निश्चित राहील. एसबीआय, एचडीएफसी सध्या 7.75 टक्के आणि 7.95 टक्के दराने कार कर्ज देत आहेत.

वैयक्तिक कर्जाबद्दल बोलायचे झाले तर, आपण आपल्या क्रेडिट स्कोअरकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात बँका व्याज दरात वाढ करणार नाहीत. अशा परिस्थितीत सीआयबीआयएलच्या चांगल्या स्कोअरमुळे कमी व्याज दराचा फायदा तुम्हाला मिळू शकेल. अशा परिस्थितीत घाईत कर्ज घेण्याचे निर्णय घेऊ नका. स्वत: साठी एक चांगला पर्याय शोधण्याची खात्री करा.

वैयक्तिक कर्जाचा कालावधी सहसा 3-5 वर्षे असतो. पहिला अर्धा कालावधी, कर्जदारांच्या ईएमआयची मोठी रक्कम व्याज परतफेड म्हणून भरला जातो. त्यासाठी चांगला पर्याय शोधा. जर तुम्ही सध्या कर्ज घेत असलेली कंपनी किंवा सावकार जास्त व्याज दर आकारत असेल, तर तुम्ही फंड ट्रांसफरचा फायदा घेऊ शकता.