महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी थेट सर्वोच्च न्यायालयातून तुमच्या स्क्रीनवर; पाहा LIVE VIDEO

Shiv Sena MLA Disqualification Result: : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीला तारीख पे तारीख मिळत असतानाच आता मात्र निकालाची तारीख समोर आली असून, तुम्हाहा हा निकाल थेट पाहता येणार आहे. 

सायली पाटील | Updated: May 11, 2023, 11:36 AM IST
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी थेट सर्वोच्च न्यायालयातून तुमच्या स्क्रीनवर; पाहा LIVE VIDEO title=
Where to watch SC Hearing on Maharashtra political crisis MLA Disqualification live video

SC Hearing MLA Disqualification LIVE: महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपशी (BJP) हातमिळवणी केली. तिथं शिवसेनेला सुरुंग लागला आणि इतक्या वर्षांपासून सुरु असणारा पक्ष विभागला गेला. शिंदे गटानं भाजपच्या साथीनं राज्यात सत्तास्थापन केली आणि एकनाथ शिंदे राजच्याचे नवे मुख्यमंत्री झाले. असं असतानाच तिथं दिल्ली दरबारी  मात्र राज्याच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण निकाली निघत नव्हतं. 

महिने उलटले, ही प्रतीक्षा लांबतच गेली आणि अखेर तो दिवस उजाडला. सातत्यानं खळबळ सुरु असणाऱ्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल नेमका कधी लागणार यावरून सर्वोच्च न्यायालयानं पडदा उचलला आणि राज्यातील नागरिकांचे कान टवकारले. 

न्यायालयाचं कामकाज, पाहा लाईव्ह... 

न्यायालयात पाच न्यायाधीशांचं घटनापीठ एकमातानं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल देईल. किंबहुना या निकालाची उत्सुकता पाहता, तुम्हीही तो थेट पाहू शकणार आहात. अर्थात सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज कसं चालतं, आजच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे काय असतील? इथपासून ते अगदी न्यायमूर्ती चंद्रचूड कोणते मुद्दे अधोरेखित करत निकाल सुनावतील हे सर्वकाही तुम्हाला LIVE पाहता येणार आहे. 

हेसुद्धा वाचा : #राहाणारकीजाणार?: एकनाथ शिंदे यांची आमदारकी गेली तर शिवसेना हातातून जाणार का?

(Supreme Court of India) सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत युट्यूब चॅनलवरून (You Tube Channnel) ही सुनावाणी प्रसारित करण्यात येणार आहे. सकाळी ठीक साडेदहा वाजल्यापासून युट्यूबवर हे टेलिकास्ट सुरु होणार असून, राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल 11 वाजता लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

देशाच्या राजकारणातील सध्याच्या घडीची सर्वात मोठी घटना म्हणून या सत्तासंघर्षाकडे पाहिलं जात आहे. किंबहुना राजकीय अभ्यासकांनी या निर्णाला अनुसरून अनेक अंदाजही वर्तवण्यास सुरुवात केली आहे. कोणाच्या मते निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागून सरकार कायम राहील. तर, कोणाच्या मते सरकार पडेल आणि पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात नवं वादळ येईल. 

अंदाजांच्या धर्तीवर आता एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद जाणार की राहणार? आणि त्यांच्यासोबत आलेल्या, ठाकरेंशी बंड करणाऱ्या इतर आमदारांचं काय होणार? असेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालाची इथं नेमकी किती महत्त्वाची भूमिका असेल हा मुद्दाही इथं लक्षात घेण्याजोगा असेल. त्यामुळं ही सगळी गुंतागुंत आणि त्यानंतर होणारी सुनावणी पाहणं देशातील नागरिकांसाठीसुद्धा एक मोठी संधीच असणार आहे.