NBFC FD Rates: 'या' NBFC बँक FD वर देतायत 8% हून जास्त व्याज; ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा

NBFC FD Rates: देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काही गोष्टींबाबतचे अनेक प्रश्न उभे राहत आहेत. यातून मिळणाऱ्या उत्तरांमुळे अनेकांचं समाधान होतंय तर काहींचा हिरमोड. ही बातमी दिलासा देणारी...   

Updated: Jan 31, 2023, 12:15 PM IST
NBFC FD Rates: 'या' NBFC बँक FD वर देतायत 8% हून जास्त व्याज; ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा
which NBFC banks offers more than 8 percent FD Rates for senior citizens read details

NBFC FD Rates: देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर होण्यापूर्वी अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यामध्ये आर्थिक व्यवहारांशी संबंधित बरेच प्रश्न विचारले जात आहेत. सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे एनबीएफसी आणि त्यांच्याडून देण्यात येणाऱ्या व्याजदरांबाबतची. Non-bank financial institution म्हणजेच एनबीएफसीकडून ग्राहकांना पावलोपावली नफा देणाऱ्या सेवा पुरवल्या जातात. या सुविधा बऱ्याच अंशी बँकेतील एफडीसारख्याच असतात. पण, सुरक्षिततेच्या मुद्द्यावर यामध्ये तफावत दिसू शकते. कारण, एनबीएफसीला डिपॉजिट इंश्योरेंस एंड क्रेडिट गॅरंटी (डीआईसीजीसी)कडून संरक्षण दिलं जात नाही. सध्याच्या घडीला अशा 5 महत्त्वाच्या बँका आहेत ज्यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवर 8 टक्क्यांहून जास्त व्याजदर दिले जातात. 

मुथूट फायनान्स 

muthoot finance कडून मुथूट कॅपअंतर्गत व्यात दिला जातो. इथं एफडीसाठी  6.25% ते 7.25% इतका व्याजदर मिळतो. 

एलआयसी

LIC housing finance कडून खातेदारांना एफडीवर 7% ते 7.50% इतका व्याजदर मिळतो. 

हेसुद्धा वाचा : Vehicle Policy: 1 एप्रिलपासून देशातील रस्त्यांवरून गायब होणार 'ही' वाहनं; नितीन गडकरींची घोषणा

 

सुंदरम फायनान्स एफडी

sundaram finance कडून नियमित खातेधारकांसाठी 7.20% ते 7.50% इतका व्याजदर दिला जातो. ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये आणखी 0.50 टक्के वाढीव व्याज दिला जातो. 

श्रीराम फायनान्स एफडी 

shriram finance fd कडून दरवर्षी 7.30% ते 8.25% इतकं व्याज दिलं जातं. 60 वर्षे किंवा त्यावरून अधिक वय असणाऱ्यांना वाढीव 0.50 टक्के व्याजदर मिळतो. ज्यामुळं ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या व्याजदराचं प्रमाण 8.75 टक्क्यांवर जातं. 

बजाज फिनसर्व 

bajaj finserv कडून एफडीवर दिल्या जाणाऱ्या व्याजाचं प्रमाण 7.15% ते 7.85% इतकं आहे. वरिष्ठ नागरिकांना यामध्ये 0.25 टक्के वाढीव व्याज दिला जातो. ज्यामुळं त्यांना मिळणाऱ्या व्याजाचा आकडा 8.10 टक्क्यांवर पोहोचतो.