मुंबई : साप नुसतं उच्चारलं तरी भीती वाटते. मग किंग कोब्रा तुमच्या समोर येऊन बसला तर... तर ही कल्पनाच न केलेली बरी. एका महिलेच्या पायाला तब्बल दीड तास वेटोळे घालून किंग कोब्रा असल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने अगदी याची देही मृत्यू पाहिल्यासारखं झालं. जीवन मरणाचं हे अंतर दीड तासाचं होतं. दीड तासात काहीही झालं असतं.
ही घटना बिहारमधी कल्याण टोळा येथील. मनोज मंडळच्या पत्नीच्या पायाला या कोब्राने तब्बल दीड तास वेटोळे घालून बसला होता. विषारी कोब्रा आपल्या पायाला गुंडाळून बसल्याचं बघितल्यावर या महिलेची झोपच उडाली. पण दीड तास कोणतीही हालचाल न करता ही महिला अगदी शांत बसून राहिली. दीड तासाने हा कोब्रा निघून गेल्यावर महिलेच्या जीवात जीव आला.
ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. मच्छरदानीत झोपलेल्या महिलेचा एक पाय बाहेर आला. रात्री उशिरा या महिलेला आपला पाय जड झाल्याचं जाणवलं. म्हणून पाय न हलवता ही महिला उठली. बघते तर काय एका सफेद रंगाच्या कोब्राने महिलेच्या पायाला वेटोळे घातले होते. पाहता क्षणी महिला घाबरली पण कोणताही गोंधळ न घालता ती तसेच बसून राहिली. दीड तासाने हा कोब्रा स्वतःहून निघून गेला.