मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organisation - WHO) चे महासंचालक (Director) टी.ए. गेब्रेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus)यांनी भारताचं कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींची आभार मानले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भागीदारीबाबत पंतप्रधान मोदी आणि WHO यांची बुधवारी चर्चा झाली.
या चर्चेत WHO ने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोवॅक्स (Covax) आणि कोरोनालसीबाबत उचलेले पाऊल हे जागतिक पातळीवर कौतुकास्पद असल्याचं म्हणत आभार मानले आहेत. यावेळी आधुनिक वैद्यकीय पद्धतीसोबत पारंपारिक औषधांचा समावेश करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.
I thanked Prime Minister @narendramodi for his strong commitment to COVAX and making #COVID19 vaccines a global public good. The pandemic is an unprecedented challenge for the world, and we agreed to work shoulder to shoulder to end it. #ACTtogether
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) November 11, 2020
Namaste, Prime Minister @narendramodi, for a very productive call on how to strengthen our collaboration & advance access to knowledge, research and training in traditional medicine globally. @WHO welcomes India's leading role in global health, & to universal health coverage.
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) November 11, 2020
टी.ए. गेब्रेयेसस यांनी म्हटलं की, 'पंतप्रधाव मोदींसोबत खूप महत्वाचा फोन कॉल झाला. या चर्चेदरम्यान नरेंद्र मोदींनी कोरोनावर मात करताना अन्य रोगांविरूद्धच्या लढाईत सुद्धा लक्ष विचलित होऊ नये, यावरही भर दिला. विकसनशील देशांमध्ये आरोग्य यंत्रणेला संघटनेने दिलेल्या पाठिंब्याचे महत्त्वही त्यांनी व्यक्त केले.'
Had an excellent conversation with DG of @WHO @DrTedros. We discussed the vast potential of traditional medicine for promoting health and wellness in the world. I also assured India's support to WHO and the world community in the fight against COVID-19. https://t.co/IjvFRMOzUv
— Narendra Modi (@narendramodi) November 11, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील WHO चे आभार मानले आहेत. यावेळी जागतिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी पारपंरिक औषधांची किती मदत होते यावर चर्चा करण्यात आल्याचं मोदींनी म्हटलं.