एकाच वेळेस रस्त्यावर हजारो कंडोम कोणी फेकले? अखेर नाव समोर

कचऱ्यात कंडोम सापडल्यानंतर जिल्ह्याचे सीएमओ डॉ. आलोक कुमार शर्मा यांनी रात्री अवध कॉलनीत छापा टाकला.

Updated: Mar 24, 2022, 07:47 PM IST
एकाच वेळेस रस्त्यावर हजारो कंडोम कोणी फेकले? अखेर नाव समोर title=

लखनऊ : उत्तर प्रदेशातील पिलीभीतमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यापूर्वी हजारो कंडोमची पाकिटे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलेली आढळली होती. ज्यामुळे सगळ्याच गावकऱ्यांना धक्का बसला. हे कोणी केलं आणि का केलं असेल. या मागचं उत्तर मात्र कोणालाच ठाऊक नव्हतं. परंतु काही दिवसानंतर हे काम कोणी आणि का केलं? या मागचा उलघडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हे कंडोम लखीमपूरच्या एनजीओ जेएन बालकुंजला पाठवण्यात आले होते.

कचऱ्यात कंडोम सापडल्यानंतर जिल्ह्याचे सीएमओ डॉ. आलोक कुमार शर्मा यांनी रात्री अवध कॉलनीत छापा टाकला, ज्यामध्ये संपूर्ण वास्तव समोर आले. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलेले हजारो कंडोम भारत सरकार नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NACO) या एनजीओला पाठवले होते.

या घटने संबंधीत माहिती समोर आल्यानंतर जिल्ह्याचे सीएमओ यांनी या घटनेचा शोध घेण्यास सुरुवात केला. तेव्हा त्यांना याचं उत्तर समोर आलं.

नखासा परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेले हजारो कंडोम राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेने (NACO) लखीमपूरस्थित एनजीओ जेएन बालकुंजला पाठवले. 

त्यानंकर तत्यांना छाप्यात सापडलेले नमुने आणि कचऱ्यात सापडलेले कंडोम यांचे नमुने जुळले आणि एकाच बॅचचे असल्याचे समोर आले. यावरून सरकारी योजनांची कशी तोडफोड केली जात आहे, याची पुष्टी झाली.

एनजीओ कार्यालयात सापडलेला नमुनाही सीएमओने जप्त केला. बुधवारी सीएमओने एनजीओ चालवणाऱ्या लोकांनाही आपल्या कार्यालयात बोलावून त्यांची चौकशी केली. आता या प्रकरणाचा अहवाल NACO ला पाठवण्यात येणार आहे.

20 मार्चनंतरही हजारो कंडोम तीन दिवस कचऱ्यात पडून आहेत, जे अनेक लोक घेऊन जात आहेत.

सीएमओने हे कंडोम यापुढे वापरात न आणण्याचे आधीच स्पष्ट करूनही हे कंडोम अद्याप नष्ट करण्यात आलेले नाहीत.

एनजीओच्या वतीने स्पष्टीकरण देताना, त्यांच्याकडे 250 सेक्स वर्कर, 150 ड्रग व्यसनी आणि 50 उभयलिंगी लोक आहेत, ज्यांना कंडोमचे वाटप केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. यापैकी काहींना स्वयंसेवक बनवण्यात आले आहे. त्यांच्याकडे दर महिन्याला सुमारे सहा ते आठ हजार गर्भनिरोधक वाटपासाठी येतात, मात्र स्वयंसेवकांनी ते वितरित केले नाही आणि फेकून दिले.