Edwina Mountbatten : कोण होत्या लेडी माऊंटबॅटन, नेहरुंसोबत काय होतं त्यांचं नातं?

'एका बाईसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केल्याचा खळबळजनक आरोप रणजीत सावरकरांनी नेहरूंवर केला. लेडी माऊंटबॅटन, अर्थात एडविना माऊंटबॅटन (Edwina Mountbatten) यांच्यासाठी नेहरूंनी भारताचा विश्वासघात केल्याचाही आरोप त्यांनी केला. 

Updated: Nov 19, 2022, 08:59 AM IST
Edwina Mountbatten : कोण होत्या लेडी माऊंटबॅटन, नेहरुंसोबत काय होतं त्यांचं नातं? title=
who was Edwina Mountbatten the one whos name is connected with former prime minister pandit jawaharlal nehru

Edwina Mountbatten : 'एका बाईसाठी नेहरूंनी देशाची फाळणी केल्याचा खळबळजनक आरोप रणजीत सावरकरांनी नेहरूंवर केला. लेडी माऊंटबॅट, अर्थात एडविना माऊंटबॅटन (Edwina Mountbatten) यांच्यासाठी नेहरूंनी भारताचा विश्वासघात केल्याचाही आरोप त्यांनी केला. (India) भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल १२ वर्षे नेहरूंनी (Pandit jawaharlal nehru) लेडी माऊंटबॅटन यांच्या सांगण्यावरून देशाची गुप्त माहिती ब्रिटीशांना (Britishers) पुरवल्याचा दावाही रणजीत सावरकरांनी केला. ज्यानंतर एकाएकी (Edwina Mountbatten ) एडविना माऊंटबॅटन आणि नेहरुंचं नातं नेमकं काय होतं, याविषयीच्या चर्चा आणि प्रश्न उपस्थित झाले. 

कोण होत्या एडविना माऊंटबॅटन ? (Who was Edwina Mountbatten ?)

भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन (Viceroy Lord Mountbatten) यांच्या पत्नी म्हणजे एडविना माऊंटबॅटन. असं म्हटलं जातं की, (British Government) ब्रिटनच्या सरकारकडून लेडी माऊंटबॅटन आणि नेहरु यांच्याशी संबंधित काही दस्तऐवज गुप्त ठेवण्यासाठी ब्रिटनच्या सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. आतापर्यंत गुलदस्त्यात असणारी ही माहिती जाहीर झाल्यास ब्रिटनच्या भारत आणि पाकिस्तानशी असणाऱ्या संबंधांवर परिणाम पडू शकतो असं सांगण्यात येत आहे. 

अधिक वाचा : 'एका बाईसाठी पंडित नेहरूंनी देशाची फाळणी केली...' रणजीत सावरकरांचा खळबळजनक आरोप...

ब्रिटनच्या राजघराण्याकडून हे पुरावे आणि दस्तऐवज जाहीर करण्यास नकार, पण असं का? 

लॉर्ड माउंटबॅटन (Lord Mountbatten) हे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय असण्यासोबतच त्यांचं ब्रिटनच्या राजघराण्याशी खास नातं होतं. ते बॅटनबर्गचे राजकुमार लुईस (Prince Louis of Battenberg) आणि हेस्सीच्या राणी व्हिक्टोरिया (Queen Victoria of Hesse) यांचे सुपुत्र होते. ब्रिटनच्या राजघराण्याशी माउंटबॅटन यांच्याशी असणारे संबंध पाहता नेहरू आणि त्यांच्या पत्नीमध्ये असणाऱ्या नात्याची माहिती आणि काही दस्तऐवज जगासमोर येऊ देण्यास राजघराण्याचा नकार आहे. 

पॅमेला माउंटबॅटन यांच्या पुस्तकातून अनेक खुलासे (Book by Pamela Mountbatten)

एडविना माऊंटबॅटन आणि नेहरु यांचं घनिष्ठ नातं होतं. या नात्यावर भाष्य करणारे संदर्भ लॉर्ड आणि लेडी माऊंटबॅटन यांची मुलगी पॅमेला माउंटबॅटन यांनी एका पुस्तकात नमुद केले होते. India Remembered A Personal Account of the Mountbattens, During the Transfer of Power, असं त्या पुस्तकाचं नाव. 

यामध्ये केलेले अनेक खुलासे.... 

पुस्तकात पॅमेला यांनी नेहरु आणि आपल्या आईचे जिव्हाळ्याचे संबंध होते असं लिहित वडील माऊंटबॅटन या नात्याकडे फायद्याच्या नजरेतून पाहत असल्याचं स्पष्ट केलं होतं. 

लेडी माउंटबॅटन यांना भारतातील राजकीय परिस्थितीची माहिती... 

असं म्हणतात की नेहरु लेडी माऊंटबॅटन यांच्यापासून काही लपवत नव्हते. किंबहुना ते त्यांचा एकही शब्द पडून देत नव्हते. काही ठिकाणी नमूद असणाऱ्या संदर्भांनुसार 1957 मध्ये नेहरुंनी त्यांना एक पत्र लिहित आपल्यामध्ये असणारी जवळीत आणि नात्यामध्ये असणाऱ्या अदृश्य शक्तीचा वावर, आकर्षण यावर भाष्य केलं होतं. नेहरु सहसा आपल्या पत्रांतून लेडी माऊंटबॅटन यांना भारतातील राजकीय परिस्थितीविषयी सांगत असत. नेहरु आणि लेडी माउंटबॅटन यांच्या नात्याविषयी लिहिण्या बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत. काही गोष्टी आजही गुलदस्त्यातच असल्यामुळं या नात्याच्या तळाशी बरीच माहिती दडलेली असू शकते असंही म्हटलं जातं. तूर्तास सध्या (Rahul Gandhi) राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेलं वक्तव्य पाहता त्यामुळंच हे बहुचर्चित नातं पुन्हा प्रकाशझोतात आलं आहे असं म्हणायला हरकत नाही.