नवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाईचा दर दशकातील उच्चांक 14.23 टक्क्यांवर पोहोचला आहे. खनिज तेल, बेस मेटल्स, क्रूड पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ हे त्याचे प्रमुख कारण आहे.
घाऊक किमतीवर आधारित चलनवाढ (WPI) एप्रिलपासून सलग आठव्या महिन्यात दुहेरी अंकात राहिली आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये महागाई 12.54 टक्के होती, तर नोव्हेंबर 2020 मध्ये ती 2.29 टक्के होती.
हेदेखील वाचा - नवीन वर्षात हे शेअर करतील कमाल! 2022 मध्ये कशी असेल स्टॉक मार्केटची चाल; जाणून घ्या तज्ज्ञांचे विश्लेषण
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे की, 'नोव्हेंबर 2021 मधील चलनवाढीचा दर मुख्यत्वे आधारभूत धातू, खनिज तेल, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, अन्न उत्पादने, रसायने आणि रासायनिक उत्पादने इत्यादीमुळे आहे. जो गेल्या वर्षी याच महिन्यापेक्षा खूप जास्त आहे'
इंधन आणि इलेक्ट्रिक श्रेणीतील महागाई ऑक्टोबरमध्ये 37.18 टक्क्यांच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये 39.81 टक्क्यांवर पोहोचली. अन्न निर्देशांक मागील महिन्यातील 3.06 टक्क्यांवरून दुप्पट वाढून 6.70 टक्क्यांवर पोहोचला.
कच्च्या पेट्रोलियममधील महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये 80.57 टक्क्यांच्या तुलनेत या महिन्यात 91.74 टक्के राहिला. तथापि, ऑक्टोबरमधील 12.04 टक्क्यांच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये उत्पादन वस्तूंच्या उत्पादनात 11.92 टक्क्यांनी घट झाली आहे.
हेदेखील वाचा - Rakesh Jhunjhunwala यांच्या या स्टॉकने मिळवला छप्परफाड पैसा; एका वर्षात संपत्ती तिप्पट
सोमवारी जाहीर झालेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की Consumer Price Index (Combined) नोव्हेंबरमध्ये 4.91 टक्क्यांच्या तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे.
जी एका महिन्यापूर्वी 4.48 टक्के होती. खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली वाढ हे त्याचे कारण आहे.