नवी दिल्ली : भारताशी युद्ध करण्यास चीन का घाबरतोय याच्या कारणांची आता जोरदार चर्चा आहे, मागील काही दिवसांपासून चीन-भारत सीमेवर दोन्ही देशांमध्ये तणाव सुरू आहे.
भारताला १९६२ साली चीनसोबत झालेल्या युद्धात हार पत्करावी लागली आहे, हे जरी सत्य असले तरी त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती फार वेगळी आहे.
कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे अनेक देशांशी संबंध मजबूत आहे, या दरम्यान चीनने अनेक देशांशी शत्रृत्व वाढवून ठेवले आहे, चीन आणि अमेरिका तसेच चीन आणि जपान यांचे संबंध देखील तसे तणावपूर्ण आहेत.
हे देश याबाबतीत भारताच्या पाठीशी उभे राहतील हे चीनला माहिती आहे.
भारताचा संरक्षण बजेट हा ५३ बिलियन डॉलर आहे. एवढा बजेट जगात सध्या आशियात कुणाकडे नाही. आंतरराष्ट्रीय दर्जेची अनेक शस्त्रास्त्र भारताकडे आहेत. अमेरिका, जपान, रशिया, फ्रान्स सारखे देश याबाबतीत भारताला पाठिंबा देतात याची चीनला कल्पना आहे.
सर्वात महत्वाचं कारण हे देखील आहे की, चीनची अर्थव्यवस्था एवढी चांगली राहिलेली नाही, चीनच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठं संकट असताना, चीनला भारतासारखी बाजारपेठ गमवायची नाही.