Covid-19 : अचानक देशभरात का वाढला कोरोना? डॉ. हर्ष वर्धन यांनी दिले 'हे' कारण

देशाची चिंता वाढत असताना हा कोरोना का वाढला आहे, याचे कारण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन  (Harsh Vardhan) यांनी सांगितले आहे. 

Updated: Apr 7, 2021, 10:27 AM IST
Covid-19  : अचानक देशभरात का वाढला कोरोना? डॉ. हर्ष वर्धन यांनी दिले 'हे' कारण title=

मुंबई : देशाची चिंता वाढत असताना हा कोरोना का वाढला आहे, याचे कारण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन  (Harsh Vardhan) यांनी सांगितले आहे. (Coronavirus in India) कोरोनाचा उद्रेक दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे. गेल्या 24  तासांत देशात 1,15,736 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.  महाराष्ट्रासह अन्य राज्यांत वेगाने कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यामुळे नवीन कोरोना रुग्णांची भर पडल्याने हा नवा उच्चांक नोंदवण्यात आला आहे.

भारतात कोरोनाव्हायरसचा वाढता प्रसार झाल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी मंगळवारी 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत बैठक घेतली. जिथे कोरोनामधील प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. यावेळी त्यांनी कोविड -19 मधील नवीन प्रकरणांमध्ये अचानक वाढ होण्याचे कारणही सांगितले.

कोविड -19 प्रकरणे अचानक देशभरात का वाढली?

बैठकीत डॉ. हर्ष वर्धन यांनी कोविड -19धील वाढती घटनांमध्ये मोठ्या विवाहसोहळा, स्थानिक संस्था निवडणुका, शेतकरी आंदोलन दरम्यान कोविडचा प्रोटोकॉल न पाळण्याचे सर्वात मोठे कारण सांगितले. या बैठकीत महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि झारखंडच्या आरोग्य मंत्र्यांचा समावेश होता. डॉ. हर्ष वर्धन यांनी स्पष्टपणे सांगितले की देशातील बहुतेक सर्व भागांत, विशेषत: या 11 राज्यांत या प्रकरणात होणाऱ्या वाढीमागे मोठे कारण म्हणजे लोक कोविडचे नियम प्रकारे पाळण करीत नाही. तसेच मास्क वापण्याचेही सोडून दिले आहे. बेजबाबदारीमुळे ही वाढ झाली आहे. 

कोविड नियमांना 'तिलांजली' दिली गेली :  डॉ. हर्ष वर्धन

डॉ. हर्ष वर्धन बैठकीत म्हणाले, कोविड नियमांना  लोकांनी' तिलांजली 'दिल्याचे दिसते. ना कोणी मास्क लावत आहेत, ना सामाजिक अंतर पाळले जात आहे, ना कोणी गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. ते पुढे म्हणाले, 'गेल्या वर्षी आमच्याकडे लसदेखील नव्हती आणि हे सर्व नियम पाळले गेले, त्यामुळे ही प्रकरणे कमी झाली.'

या राज्यांमध्ये सर्वात वाईट परिस्थिती 

डॉ. हर्ष वर्धन बैठकीत म्हणाले, 'कोरोना विषाणूपासून बरे होण्याचे प्रमाण 92.38 टक्के आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असूनही मृत्यूचे प्रमाण 1.30 टक्के आहे. ते पुढे म्हणाले, 'सर्वात जास्त प्रभावित राज्य छत्तीसगडमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण 20 टक्के आणि वाढीचा दर 8 टक्के आहे. त्याचवेळी, पंजाबमध्ये यूकेचे 80 टक्के रूप आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये दररोज कोरोनो विषाणूचे प्रमाण वाढले आहे. एका दिवसात नोंदवलेल्या 81.90 टक्के प्रकरणे या राज्यांमधून समोर आली आहेत.