मुंबई : सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यासक्रम हा जगातील सर्व परीक्षांपेक्षा कठीण आहे. म्हणूनच ही परीक्षा पास करण्यासाठी लोकांना खूप मेहनत घ्यावी लागते. परंतु असे असले तरी चांगला अभ्यास केला की, सर्व गोष्टी या सोप्याच वाटतात. UPSC अभ्यासक्रमात देशातील आणि जगातील सर्व गोष्टींचा तपशील असतो. वर्षानुवर्षे कष्ट करणाऱ्यांना नागरी सेवेत यश मिळते. मुख्य परीक्षे व्यतिरिक्त, UPSC मुलाखत हे उमेदवारांसाठी सर्वात मोठे आव्हान आहे.
येथे त्यांना जगातील कोणत्याही गोष्टीबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांना प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवावे लागते. आज आम्ही तुम्हाला UPSC मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत. पाहा तुम्हाला याचं उत्तर माहितीय का?
1. वकील नेहमी काळा कोट का घालतात?
उत्तर- काळा कोट अधिकार आणि शक्ती दर्शवतो. त्यामुळे न्यायाच्याप्रती आपली अधीनता दाखण्यासाठी वकील काळा कोट घालतात.
2. जगातील सर्वात लहान देशाचे क्षेत्रफळ किती आहे?
उत्तर- व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. त्याचे क्षेत्रफळ 0.49 चौरस किलोमीटर आहे.
3. कोणत्या देशात फक्त 40 मिनिटे रात्र असते?
उत्तर - नॉर्वे
4. कोणत्या जीवाचे पोटात दात असतात?
उत्तर- खेकड्याचे दात त्याच्या पोटात असतात.
5. अशी कोणती गोष्ट आहे जी प्रत्येकाला येते पण कोणाला ही दिसत नाही?
उत्तरः झोप
6. अशी कोणती गोष्ट आहे जी महिन्यातून एकदा येते आणि 24 तासांनंतर नाहीशी होते?
उत्तर - तारीख
7. कोणत्या प्राण्याला 5 डोळे आहेत?
उत्तर - मधमाशी
8. कोणत्या देशात दरवर्षी राष्ट्रपती निवडला जातो?
उत्तर - स्वित्झर्लंड