पेनाच्या टोपणला छिद्र का असते? या मागचं कारण अखेर समोर, जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

प्रत्येक पेनाच्या टोपणाला एक होल किंवा छिद्र असतं. परंतु ते का असतं? असा कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का?

Updated: Mar 15, 2022, 08:58 PM IST
पेनाच्या टोपणला छिद्र का असते? या मागचं कारण अखेर समोर, जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य title=

मुंबई : आपल्यापैकी सगळेच लोक काहीना काही लिहिण्यासाठी पेनचा वापर करतात. शक्यतो शाळेतील मुलं किंवा कॉलेजमधील विद्यार्थी पेनचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. परंतु दैनंदिवसात रोज वापरल्या जाणाऱ्या पेनबाबत एक गोष्ट तुम्ही नोटीस केलीय का? प्रत्येक पेनाच्या टोपणाला एक होल किंवा छिद्र असतं. परंतु ते का असतं? असा कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का? तर आज आम्ही तुम्हाला या मागील वैज्ञानिक कारण सांगणार आहोत.

पेनच्या टोपणला छिद्र का असतात?

पेनच्या टोपणावरील छिद्र हवेचा दाब नियंत्रित करते आणि त्याची शाई सुकण्यापासून रोखते. याशिवाय या छिद्रामुळे हवेच्या दाबाशिवाय पेन बंद करणे आणि उघडणे सोपे होते.

चघळण्याच्या धोकादायक सवयीतून ही कल्पना पुढे आली

तसेच याला छिद्र ठेवण्यामागे एक मोठा हेतु आहे. ते म्हणजे कोणच्या जिवावर बेतण्यापासून वाचवणे. मोठ्या लोकांसोबतच अनेक लहान मुलांनाही पेनचं टोपण चघळायला आवडते आणि असे केल्याने टोपण चुकून तुमच्या घशात देखील जाऊ शकतं, जे अधिक धोकादायक आहे.

जर तुम्ही किंवा एखाद्या मुलाने पेनचं टोपण गिळलं तर ते शरीराच्या विंडपाइपमध्ये अडकू शकते. जे  खूप धोकादायक असू शकते. अशा अपघातापासून लोकांना वाचवण्यासाठी पेन कंपन्या याला छिद्र करु लागले आहेत. ज्यामुळे हे जरी कोणाच्या घशात गेलं, तरी त्या व्यक्तीला श्वास घेता येईल आणि तो गुदमरणार नाही.

एका पेन कंपनीच्या वेबसाइटनुसार, पेनच्या टोपणमधील छिद्र पेन लिक होण्यापासून किंवा ते गळण्यापासून प्रतिबंधित करते आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचे पालन करते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, 2016 च्या एका अहवालानुसार, अमेरिकेत दरवर्षी सुमारे 100 लोकांचा पेनचं टोपण गिळल्यामुळे गुदमरून मृत्यू होत आहे.