नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन या दोन्ही राष्ट्रांमध्ये पडलेली युद्धाची ठिणगी आता वणव्यामध्ये बदलताना दिसत आहे. हे युद्ध आता थांबावं असंच संपूर्ण जगाला वाटत आहे. यादरम्यानच परदेशात शिक्षणासाठी असणाऱ्या, विशेष म्हणजे युक्रेनमध्ये असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी मायदेशाची वाट धरली. (Russia ukraine)
अद्यापही काही विद्यार्थी परदेशात आहेत. पण, आता प्रश्न असा की भारतीय विद्यार्थी वैद्यकिय शिक्षणासाठी युक्रेनला इतकी पसंती का देतात?
यामागे काही अशी कारणं आहेत ज्यांकडे लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं. चला, जाणून घेऊया ही कारणं...
उच्च शिक्षणाची पद्धत
युक्रेन हे उच्च प्रतीच्या शिक्षणासाठी ओळखलं जातं. वैद्यकिय पदवीधारक उत्तीर्ण करण्यामध्ये हा देश चौथ्या क्रमांकावर येतो.
खर्च
भारतातील खासगी वैद्यकिय महाविद्यालयांच्या तुलनेत युक्रेनमध्ये शिक्षणाचा खर्च अतिशय कमी असल्यामुळं या देशाकडे अनेकांचा रोख.
प्रसिद्ध महाविद्यालयं
युक्रेनमधील अनेक महाविद्यालयं ही जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यताप्राप्त आहेत. शिवाय तेथील पदवीला भारतातही मान्यता आहे.
प्रवेश परीक्षेचा ताण नाही
भारतीय विद्यार्थी वैद्यकिय शिक्षणासाठी युक्रेनची निवड करतात कारण, इथे बऱ्याच प्रसिद्ध महाविद्यालयांमध्ये प्रवेश परीक्षेची अट नसते. ज्यामुळं या देशाची वाट अनेकजण धरतात.