कोरोना इतका भयंकर का होतोय? AIIMSच्या संचालकांनी सांगितली 2 कारणं

 रूग्णांची वाढती संख्या पाहाता केंद्र आणि राज्य सरकार अनेक महत्त्वच्या भूमिका बजावत आहेत.

Updated: Apr 17, 2021, 06:32 PM IST
कोरोना इतका भयंकर का होतोय? AIIMSच्या संचालकांनी सांगितली 2 कारणं title=

मुंबई  : देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रूग्णांची वाढती संख्या पाहाता केंद्र आणि राज्य सरकार अनेक महत्त्वच्या भूमिका बजावत आहेत. तरीदेखील रूग्णांचा आकडा सध्या मंदावताना दिसत नाही. गेल्या वर्षी आलेलं हे कोरोना वादळ अधिक तिव्र होत आहे. त्यामुळे देशातल्या प्रत्येक नागरीकाने सतर्क राहाण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. तर कोरोना दिवसागणिक इतका भयंकर का होत आहे. याची 2 कारणं AIIMSचे  संचालक रणदीप गुलेरिया (Dr Randeep Guleria)यांनी सांगितली आहेत. 

संचालक रणदीप गुलेरिया  म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात  होण्याचं पहिलं कारण म्हणजे, जेव्हा जानेवारी महिन्यात लसीकरणाला सुरूवात झाली. तेव्हा सर्वत्र कोरोना नियमांचं उल्लंघन होताना दिसून आलं. याच दरम्यान कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. शिवाय गुलेरिया यांनी लस 100 टक्के परिणामकारक नसते. आपण देखील परिस्थितीचं बाळगायला हवं. 

लस दिल्यानंतरही लोक संक्रमित होऊ शकतात, परंतु आपल्या शरीरातील एंटीबॉडीज व्हायरस अधिक प्राणघातक होऊ देत नाहीत. अशा परिस्थितीत, लसीमुळे रोगाची तीव्रता कमी होऊ शकते.असं देखील गुलेरिया म्हणाले. एकंदर परिस्थिती  पाहाता सर्वांनी काळजी घेणं फार गरजेचं आहे. 

24 तासात 1 लाख 99 हजार 620 लोक संक्रमित 
गेल्या 24 तासात 1 लाख 99 हजार 620 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. या काळात 1 हजार 37 लोक मरण पावले. त्यानंतर, भारतात कोरोनाची लागण होणारी संख्या 1 कोटी 40 लाख 70 हजार 300 पर्यंत गेली आहे आणि 1 लाख 73 हजार 152 लोकांचा मृत्यू झाला आहे.