नवी दिल्ली : भाजपला घरचा अहेर देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर आगपाखड केली आहे. ‘माझा भाजप सोडण्याचा कोणताही विचार नाहीये, पक्षाला मला बाहेर काढायचं तर काढू शकता’, असे ते म्हणाले.
यशवंत सिन्हा म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते प्रयत्न करीत आहेत आणि त्यांनी त्यांना अनेक पत्रही लिहिले आहेत. पण काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर त्यांनी राष्ट्र मंच नावाने एक संघटना तयार केली आहे’.
ते म्हणाले की, ‘मी भाजप का सोडू? मी २००४ ते २०१४ पर्यंत यूपीए सत्तेत असताना खूप मेहनत केली आहे. जर पक्षाला मला बाहेर फेकायचं आहे फेकू द्या’.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले सिन्हा म्हणाले की, सध्या सरकारची नीति निवडणुकीच्या जाहीरनाम्यात करण्यात आलेल्या आश्वासंनाच्या अनुरूप नाहीये. माझा विरोध त्यांनी भाजपच्या निवडणुकीच्या घोषणापत्राच्या लाईनवर परत आणणे आहे. मी गेल्या चार वर्षांपासून यासाठी सक्रिय आहे’.