अचानक Tata, Flipkart का देऊ लागलेत LGBTQIA समुदयातील सदस्यांना नोकरी? समोर आलं कारण

या कंपन्या यांना फक्त नोकरीच देत नाहीत तर, त्यांच्यासाठी कामाच्या ठिकाणी अनेक बदल देखील करत आहे.  जगभरातील LGBTQIA+ समुदायात जून महिना 'प्राइड मंथ' म्हणून साजरा केला जातो. अशातच भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात LGBTQIA समुदयातील लोकांना मोठी संधी दिली जात आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 4, 2023, 06:52 PM IST
अचानक Tata, Flipkart का देऊ लागलेत LGBTQIA समुदयातील सदस्यांना नोकरी? समोर आलं कारण title=

Pride Month Special  LGBTQIA+ : फक्त भरातातच नव्हे तर संपूर्ण जगात LGBTQIA  सुमदयाला वेगळ्या नजरेने पाहिले जाते. हक्कासाठी यांची न्यायालयीन लढाई सुरु आहे. समाजाने त्यांना स्वीकारले नाही तर कायद्याने त्यांना मान्यता दिलेली नाही. तर, दुसरीकडे कॉर्परेट कंपन्या  LGBTQIA समुदयातील सदस्यांना नोकरीची संधी देत आहेत. Tata, Flipkart सारख्या बड्या कंपन्यांमध्ये LGBTQIA  सुमदायाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात नोकरी दिली जात आहे. यामागचे कारण देखील समोर आले आहे. 

अनेक कंपन्या  LGBTQIA समुदयातील लोकांना नोकरी नाकारतात. तर, दुसरीकडे अनेक बड्या कंपन्या यांना नोकरी देण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. Capemini, Axis Bank, NatWest Group, Flipkart, Schneider Electric आणि Tata Steel सारख्या बड्या कंपन्या LGBTQIA समुदायातील लोकांना मोठ्या प्रमाणात नोकरी देत आहेत. 

LGBTQIA+ समुदयात गणले जाणारे समलिंगी, उभयलिंगी, ट्रान्सजेंडर आदींसाठी भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राची दार खुली केली आहेत. यांच्या हुशारीचा, कल्पकतेचा वापर करुन कॉर्पोरेट कंपन्या कुशल मनुष्यबळ तयार करत आहे.

LGBTQIA समुदयातील कर्मचाऱ्यांसह गैरवर्तन होवू नये यासाठी विशेष खबरदारी

नोकरीच्या ठिकाणी LGBTQIA समुदयातील लोकांना काम करताना कोणतीही अडचण येवू नये यासाठी विशेष कक्ष देखील स्थापन केले जात आहे. याशिवाय स्वतंत्र शौचालय, चेंजिग रुम यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. तसेच इतर सर्व सामान्य कर्मचाऱ्यांनी  LGBTQIA समुदयातील आपल्या सहकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करु नये याची देखील कंपन्यांकडून खबरदारी घेतली जात आहे. यासाठी HR विभागामार्फत कर्मचाऱ्यांना सूचना तसेच मार्गदर्शन केले जाते.   

लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी सुटीची तरतूद

लिंग बदल शस्त्रक्रिया करु इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपन्या पूर्ण सहकार्य करत आहे. शस्त्रक्रियेसाठी 30 दिवसांची सुटी देखील दिली जाते. कंपन्यांकडून LGBTQIA समुदयातील कर्मचाऱ्यांना सर्वसमावेशक विमा संरक्षण ऑफर देखील दिली जात आहे. Axis बँकेत Pride 365 प्रोग्राम राबवला जातो. 2021 मध्ये LGBTQIA+ कर्मचार्‍यांची संख्या 13 होती. आता  LGBTQIA समुदयातील 423 कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे नॅटवेस्ट ग्रुपने 'सर्व समावेशक मार्गदर्शन कार्यक्रम' तयार केला आहे. टाटा स्टीलने 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत LGBTQIA+ समुदायातील सुमारे 100 लोकांना नोकऱ्या देऊ केल्या आहेत.