तेलुगू देसम पार्टी एनडीएतून बाहेर का पडली ?

टीडीपीनं एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated: Mar 8, 2018, 11:53 AM IST
तेलुगू देसम पार्टी एनडीएतून बाहेर का पडली ? title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : टीडीपीनं एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनी मोदींच्या मंत्रिमंडळातील त्यांच्या दोन्ही मंत्र्यांना राजीनामा द्यायचे आदेश दिले आहेत. अशोक गजपती राजू आणि वाय.एस.चौधरी हे दोन खासदार केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. याचं नेमकं कारण काय?

विशेष राज्याचा दर्जा दिला नाही

आंध्र प्रदेशला राज्याला विशेष राज्याचा दर्जा द्यावा अशी मागणी वारंवार केली. भाजपने टीडीपीची मागणी फेटाळली. पूर्वेत्तर राज्यांनाच विशेष दर्जा दिला जात असल्याचे अरूण जेटली यांचे स्पष्टीकरण. ज्या राज्यांकडे सोयी-सुविधांची कमतरता आहे. तसेच प्रतिव्यक्ती उत्पन्न कमी असेल, महसूल मिळवण्याचा मार्ग नसेल अशा राज्यांना विशेष राज्याचा दर्जा दिला जातो.

आत्तापर्यंत ११ राज्यांना विशेष राज्याचा दर्जा दिला आहे. त्यात आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम, जम्मु कश्मीर, हिमाचल प्रदेश, मिझोरम आणि नागालॅंड राज्यांचा समावेश आहे. अशा राज्यांना केंद्र सरकार ९० टक्के निधी देते. १४ व्या वित्त आयोगाने नियम ठरवले आहेत. त्यानुसार असा दर्जा आंध्र प्रदेशला देता येणार नाही.

अर्थसंकल्पात पुरेसा निधी दिला नाही

२०१८ च्या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशला विशेष पॅकेज दिले नाही. निधीची कमतरता असतानाही केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिले नसल्याबद्दल टीडीपी नाराज.

सध्या केंद्रात टीडीपीचे दोन मंत्री

अशोक गणपती राजू हे विमान उड्डाण मंत्री आहेत. तर वाई एस चौधरी विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री आहेत.